Wednesday, February 5, 2025

शिरढोण येथे अखिल भारतीय किसान सभेतर्फे कृषी विधेयकाची होळी

कवठेमहांकाळ (सांगली) : दिल्ली येथील शेतकरी आंदोलन सुरू होऊन 120 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. केंद्र सरकारने या आंदोलनाकडे उपेक्षेने पाहण्याचे धोरण घेतले असले तरी केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणांना देशव्यापी विरोध व्यक्त करण्यात येत आहे. आंदोलनाच्या मागण्या अधिक प्रखरपणे केंद्रस्थानी आणण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज 28 मार्च रोजी शिरढोण तालुका कवठेमहांकाळ येथे होळी सणाच्या दिवशी तीन शेतकरी विरोधी कायदे व चार कामगार विरोधी श्रम संहिता आणि वीज विधेयक यांचे होळीमध्ये दहन करण्यात आले. 

तसेच शिरढोण येथे सुरू असलेल्या महामार्ग बाधित शेतकर्‍यांच्या धरणे आंदोलन चा आजचा 25 वा दिवस तर साखळी उपोषण चा आजचा 6 वा दिवस. फेर सर्वे व नव्याने बाधीत शेतकर्‍यांच्या निवाडा नोटीस तातडीने द्या या मागणीसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत सर्वे झालेल्या संपूर्ण बाधीत शेतकर्‍यांच्या निवाडा नोटीस मिळणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन स्थगित न करण्याचा निर्णय किसान सभेच्या वतीने घेण्यात आल्या बाबतची माहिती किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड दिगंबर कांबळे यांनी दिली.

 

यावेळी सागर पाटील, बाळासाहेब पाटील, रावसाहेब पाटील, रजनीकांत पाटील, मच्छिंद्र पाटील, प्रदीप पाटील, सुनील करगने, प्रमोद सुर्यवंशी, गोरख सुर्यवंशी, धनाजी साळुंखे, लक्ष्मण चौगुले, आनंदराव पाटील उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles