पिंंपरी चिंचवड : लॉकडाऊन नकोण, या मागणी घेऊन क्रांती रिक्षा सेनेच्या वतीने आकुर्डी नायब तहसीलदार प्रवीण ढमाले व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर माई ढोरे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना चा संसर्ग महाराष्ट्रामध्ये परत उफाळून आला आहे. त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन सुरू केले आहे. तसेच राज्य सरकारने सूचना काढून रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यत संचारबंदी लागू केली आहे. कोरोना महामारी ला आपण गेली वर्षेभर तोंड देत आलो आहोत. सरकारने सुरुवातीला कडक लॉकडाऊन देखील केला होता. मात्र त्या दरम्यान रुग्णांची संख्या सातत्याने वाढत होती. जेव्हा टेस्ट ची संख्या वाढवली होती तसेच कोव्हिडं साठी जम्बो हॉस्पिटलची उभारणी केली होती. तेव्हा हळूहळू संख्या कमी झालेली होती. मात्र अचानक सर्व आरोग्य यंत्रणा गाफील झाल्या व रुग्णाची संख्या वाढायला सुरुवात झाली. या अगोदर लागू केलेल्या लॉकडाऊन मुळे अनेकांच्या नोकरी वर गदा आली. अनेक व्यवसाय बंद पडले हातावर पोट असणाऱ्या लोकांचे अतोनात हाल झाले.
सरकारने यामध्ये कुठेही सर्वसामान्य व गरीब कुटूंबाना दिलासा दिलेला नाही. लॉकडाऊन मुळे काम नसल्याने अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे.पगार पैसे नाहीत मात्र बँकेचे हफ्ते व घरभाडे हे नियमित द्यायलाच लागतील असे आदेश सरकारने व कोर्टाने दिले आहेत. शाळा बंद आहेत मात्र शाळेची फी मात्र संपूर्ण भरायला सांगत आहेत. वीज बिल माफ करू बोलले सरकार वाढीव वीज बिल देऊन अनेक ठिकाणी वीज कट करत आहेत. रोजगार बंद व्यवसाय बंद आहे मात्र घर टॅक्स चालू आहे. वाहन रिक्षा ट्रॅव्हल्स बंद आहेत, मात्र RTO टॅक्स सुरू आहे. नवीन व्यवसाय सुरू करायला कुठलंही प्रोत्साहन नाही. याउलट निवडणुका व प्रचार सभा मात्र जोरात सुरू आहेत. त्यामुळे फक्त गोर गरीब लोकांचा धंदा बंद करूनच कोरोना आटोक्यात येतोय का असा सवालही करण्यात आला आहे.
उद्योग धंदे बंद केल्या मुळे लोकांचे हातचे काम गेले आणि धंदे बंद पडले लोक हतबल झाले आहेत सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहे. दैनंदिन वापरातल्या वस्तूचे भाव अमाप वाढले आहे अन्यधान्य, गॅस डिझेल चे भाव वाढल्यामुळे महागाईचा भडका दररोज नव्याने होत आहे त्यामुळे एकवेळेच पोट भरणे देखील अवघड झाले झाले आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन च्या काळात रिक्षा चालकांसह हातावर पोट असणाऱ्या कष्टकर्यांवर उपासमारीची वेळ आली होती. आम्ही अनेक वेळा सरकारला मदतीचा हात मागितला परंतु आमचे कोणी ही ऐकले नाही. मदत मिळावी म्हणून क्रांती रिक्षा सेनेने अनेक आंदोलन केले तरी देखील सरकारने आमच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले. सरकार गोरगरीब कष्टकऱ्यांना मदत करत नाही आणि उपाययोजना न करता लॉकडाऊन करून जनतेच्या जीवाशी खेळत आहे. पुन्हा लॉकडाऊन केले तर कोरोना पेक्षा जास्त लोक भूकबळी, उपासमारीने, बँक वाल्याच्या हफ्ते वसुली पथकाच्या जाचाने, शाळेतल्या फी मागणीच्या वारंवार कॉल आल्याने मरतील. रात्रीची संचारबंदी लागू केल्याने अनेक भाजीपाला व्यवसायिक, हॉटेल व्यवसायिक, रिक्षा चालक देशोधडीला लागले आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरीक मरणासन्न अवस्थेत आहेत, त्यांना अजून मरणाच्या दारात उभे करू नका, असे भावनात्मक आवहानही करण्यात आले आहे.
सरकारने लॉकडाऊन च्या ऐवजी आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर द्यावा. माझे कुटूंब माझी जबाबदारी ह्या योजनेची अमलबजावणी करून घरोघरी जाऊन तपासण्या कराव्यात. मास्क, सॅनिटायझर न वापरणाऱ्या वर कठोर कारवाई करावी यातून जो दंड वसूल केला जातो तो दंड आरोग्य सुविधांंसाठी वापरण्यात यावा. प्रत्येक आस्थापने मध्ये निरोगी व्यक्तींनाच प्रवेश द्यावा. रोग प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या व्हिटॅमिन व मिनरल च्या गोळ्या मोफत उपलब्ध करून द्याव्यात. जर आरोग्य सेवक व सरकारी कर्मचारी कमी पडत असतील तिथे आमच्या सारख्या स्वयंसेवी संस्था व कार्यकर्त्याना सोबत घ्यावे.
शहरात कुठल्या ही प्रकारचे लॉकडाऊन लावू नये. सर्वात प्रथम रिक्षा चालक आणि हातावर पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांच्या पोटाचा प्रश्न अगोदर सोडवा नंतर खुशाल लॉकडाऊन करा. अन्यथा क्रांती रिक्षा संघटना, सम्राट अशोक बहुद्देशिय संस्था व इतर समविचारी संघटना असहकार आंदोलन करू व यासाठी रस्त्यावर उतरून निदर्शने व मोर्चा करावे लागतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनावर महाराष्ट्र राज्य क्रांती रिक्षा सेनेचे श्रीधर काळे, उपाााध्यक्ष बाबासाहेब आखाडे, कविता मैदाड, राम हेंडवले, सचिन नलावडे यांच्या सह्या आहेत.