श्रीगोंदा (अहमदनगर) : नाभिक समाजासह बारा बलुतेदारांना व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्या, अन्यथा आर्थिक मदत करा, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ व बारा बलुतेदार महासंघातर्फे महाराष्ट्र बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे व महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदिप पवार यांच्याकडे निवेदनद्वारे करण्यात आली.
राज्य सरकारने केलेल्या मिनी लॉकडाऊन संदर्भात नाभिक समाजाची आर्थिक स्थिती खराब झाली असून राज्य सरकारने त्यांना आर्थिक मदत द्यावी, नाभिक समाज हा सर्व व्यवसायावर अवलंबून आहे. समाजात लॉकडाऊन मुळे आत्महत्या चे प्रमाण वाढले असून त्याच्यातून सावरण्यासाठी शासनाने दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी सभापती शंकर पाडळे, पै.अजय रंधवे, कांतीलाल कोकाटे, विजय क्षिरसागर, इंद्रजीत कुटे, पै.बंटी रंधवे, भाऊसाहेब डांगे हे उपस्थित होते.