Friday, December 27, 2024
Homeआंतरराष्ट्रीयतीन महिन्यानंतर ब्रिटन अनलॉक

तीन महिन्यानंतर ब्रिटन अनलॉक


ब्रिटन : ब्रिटन ९७ दिवसांनंतर पूर्ववत होत आहे. जगातील सर्वात लांब व कडक लॉकडाऊन सोमवारपासून अनलॉक होण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना अनियंत्रित झाल्याने ५ जानेवारीपासून ब्रिटनमध्ये लॉकडाऊन लागू होता. डिसेंबरपासून ब्रिटनमध्ये अनेक प्रकारचे निर्बंध लागू होते. आता पुन्हा अनेक महिन्यांनंतर शेकडो जिम, हेअर सलून, रिटेल दुकाने सुरू झाली. नियोजित योजनेनुसार २१ जूनला पूर्णपणे लॉकडाऊन हटवला जाईल.

४ जानेवारी रोजी जॉन्सन यांनी नवीन निर्बंधांची घोषणा केली होती. तेव्हा प्रत्येक गोष्ट स्पष्ट होती. कोणते क्षेत्र कधी बंद असेल व कोणते सुरू होईल, हे जाहीर होते. त्यामुळे लोकांमध्ये गोंधळाची स्थिती नव्हती. एकीकडे लॉकडाऊन आणि दुसऱ्या बाजूने लसीकरण करून ब्रिटनने कोरोनाचा वेग नियंत्रित केला. युरोपला मंदगतीने लसीकरण व लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची वेळ आली आहे. 

जानेवारीच्या सुरुवातीला ब्रिटनमध्ये दररोज ५५ हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळत होते. आता नव्या रुग्णांची संख्या ४ हजारांहून खाली आहे. ब्रिटनने आपल्या ४८ टक्के लोकसंख्येला लस दिली आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय