पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिंचवडमधील चापेकर बंधू स्मारकाच्या पूर्णत्वासाठी 41 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. स्मारकाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, मिलिंद देशपांडे,रविंद्र नामदे, ॲड सतिष गोरडे, अमोल थोरात आदी उपस्थित होते.

चिंचवडगाव येथील क्रांतिवीर चापेकर बंधूंचा जुना वाडा ही प्राचीन ऐतिहासिक वास्तू आहे. या वाड्याच्या जीर्ण अवस्थेमुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला (पीसीएमसी) क्रांतीवीर चापेकर बंधूंचे स्मारक उभारण्याचा आदेश राज्य सरकारकडून 12 जून 1997 रोजी दिला होता. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी 1997 मध्ये झाली होती, त्यानंतर 2001 मध्ये दुसरा टप्पा होता.
खासदार श्रीरंग बारणे 1997-98 मध्ये महापालिका स्थायी समितीचा अध्यक्ष असताना त्यांनी 35 लाख रुपयांचा निधी देऊन चापेकर वाड्याची दुरुस्ती केली होती. त्यानंतर पालिकेने 12 कोटी रुपये खर्च करून वाड्याची काही कामे केली.मात्र उर्वरित 41 कोटी रुपये खर्च करणे मनपाला शक्य नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 41 कोटी मंजूर केले आहेत.

स्मारकाच्या तिस-या टप्प्यातील कामामध्ये ऐतिहासिक पुरातनकाळास साजेशी अंतर्गत सजावटीची विविध कामे आणि पहिल्या भागात राहिलेले आरसीसीचे काम प्रस्तावित आहे. यामध्ये प्रामुख्याने त्याकाळात वापरण्यात येणा-या वस्तु, भांडी, वेषभुषा अलंकार, युद्ध कलेचे साहित्य, तात्कालीन व्यक्तींचे पुतळे, पुरातन काळातील प्रसंगाचे म्युरल्स, गडकोट, किल्ले यांच्या प्रतिकृती, पुरातन भिंतीचित्रे आदी कामांचा समावेश आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन होणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
जागतिक योग दिनानिमित्त रहाटणीत योग शिबिर संपन्न
PCMC : पिंपरी-चिंचवडकरांच्या उपयोगकर्ता शुल्कसह वसुलीला विरोध
अभिनव विद्यालय जाधववाडी चिखली येथे २१ जून जागतिक योगदिन उत्साहात साजरा!

