पुणे : पुणे – सातारा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये चौघांचा मृत्यू तर 23 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर महामार्गावरील मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
पुणे – सातारा महामार्गावर वरवे गावाच्या हद्दीत 4 वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये 2 कंटेनर आणि 2 बसचा समावेश आहे. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला असून 23 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या अपघाताचा तपास सातारा पोलिसांकडून सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला बसला कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे बस रत्यावर पटली झाली. त्यामुळे आणखी दोन वाहने या वाहनांवर जोरदार आदळली. अपघातानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, अपघातानंतर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
हे ही वाचा :
बॉलीवूडला धक्का : प्रसिध्द अभिनेत्याचे निधन
नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा – राज्यपाल रमेश बैस
आषाढी वारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, अशा असणार सोयी-सुविधा
मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती
‘सौरभ पिंपळकर हा भाजपाचाच कार्यकर्ता’, चंद्रशेखर बावनकुळे यांची कबुली; पण ती धमकी नाही…
‘ह्याच्यावर संस्कार झाले आहेत… फक्त नथूरामाचे’, जितेंद्र आव्हाडांचा फोटो शेअर करत भाजपावर निशाणा
‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना’ आहे तरी काय ? वाचा !
खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ – केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय