सिंधुदुर्ग : आशा व.गटप्रवर्तकांचा २४ मे २०२१ तारखेला राज्यव्यापी संपाचा इशारा दिला असल्याची माहिती सिटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनेच्या जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष कॉ. विजयाराणी पाटील यांनी दिली.
विजयाराणी पाटील म्हणाल्या, सर्व देशभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. हजारो लोक बेड व आँक्सिजन मिळत नाही म्हणून मृत्यूमुखी पडत आहेत. सरकार सर्व जनतेला घरी बसण्यासाठी लाँकडाऊन करीत आहे. सर्व दुकाने, सेवा बंद करीत आहे.
तसेच आशांना मात्र गेले वर्षभरापासून एकही दिवस सुट्टी न घेता अहोरात्र कामाला जुंपले आहे, त्यांच्या सुरक्षेची, मानधनाची, त्यांच्या कुटुंबांच्या सुरक्षेची कोणतीही चिंता सरकार करीत नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःला सज्ज करावे लागेल, गांवात काम करीत असताना कुणाचीही दादागिरी सहन करु नका, स्वतःची तब्येत बरी नसताना सर्वेसाठी घराबाहेर पडु नका, सरळ तब्येत बरी नसल्याचे लेखी कळवा, बऱ्याच ठिकाणी सँनिटयझर व मास्क दिले जात नाहीत, ते मिळाल्याशिवाय सर्वे करु नका, असेही पाटील म्हणाल्या.
तसेच सरकारला कामाची किंमत कळावी, यासाठी सोमवार 10 मे 2021 या दिवशी काळ्या फिती लावून, काळे कपडे परिधान करुन आंदोलन करणार असल्याचेही म्हटले आहे. तसेच हे आंदोलन ग्रामपंचायतीसमोर, पीएचसीसमोर व आंदोलन करुन तसेच लेखी निवेदन देऊन करण्यात येणार आहे.
आशा व गटप्रवर्तकांना दिवसाला 300 रुपये भत्ता द्यावे, या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार आहे.