Thursday, February 6, 2025

योग अभ्यास वर्ग जुन्नर व मंथन फाउंडेशन, निरामय योग अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन योग शिबिराचे आयोजन

जुन्नर (पुणे) : सध्या जगात आणि देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. असे जरी असले तरी अनेक रुग्ण बरे होऊन मरणाच्या दारातून कितीतरी पेशंट परत येत आहेत. ते व्यवस्थितरीत्या बरे झाले कारण त्यांच्याकडे भरपुर आत्मविश्वास, सकारात्मकता आणि मनाच्या प्रचंड शक्तीचा एक चमत्कार होता. यासाठी माणूस रोज योगासने करून आपले आरोग्य उत्तम ठेऊ शकतो. 

मानवी शरीर हे देखील स्वतःच एक डॉक्टर आहे. जगातला सर्वात मोठा व सर्वात उत्तम डॉक्टर नाकावाटे घेतला जाणारा प्राणवायू आपल्या नसानसात पोहोचतो, प्रत्येक पेशीला भेटत अनेक जीवाणूंचा खात्मा करण्याची ताकद निर्माण करतो. थोडक्यात सांगायचं तर आपलं शरीरही अमृत बनवू शकते. आपण न घाबरता या साथीच्या रोगाला सामोरे जाऊया, अजिबात घाबरू नका, श्वसनाचे व्यायाम करा. अनुलोम विलोम, दीर्घ श्वसन, ओंकार जप, प्राणायाम, योगासने याद्वारे आपण आपली श्वसन रोग प्रतिकार शक्‍ती वाढवू शकतो. 

याच पार्श्वभूमीवर जुन्नर विकास मंच संचलित योग अभ्यास वर्ग जुन्नर व मंथन फाउंडेशन, निरामय योग अभ्यास केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन योग शिबिर दि. १५ मे ते २१ मे दरम्यान सकाळी ६.३० ते ७.३० दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. आपणही या शिबिरात सहभागी होऊ शकता.

या योग शिबिराला खालील तज्ञ प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत. गणेश वारे, डॉ. सुनिल पवार, रोशन गाडेकर, रंजना कदम, अंकिता रजपूत, सविता मोजाड, सीमा टाकळकर, हनुमंत शिंदे, सुजाता नरवडे, विक्रम रसाळ, रितीराज डहाळे

सहभागी होण्यासाठी या प्रशिक्षकांना संपर्क करा.

अर्चना पवार – 9921403882

प्रवीण वाघमारे – 8788115757

ज्ञानेश कुटे – 9890882700

जयसिंग मोजड – 9405852164

निलेश आमले – 9970447656

राहुल आकोलकर – 8806240760

सुनील अं. पवार – 9766136328

नाव नोंदणी करण्यासाठी वेबसाईटला भेट द्या :

https://syr.us/y99

Related Articles

- Advertisement -

Latest Articles