Wednesday, February 12, 2025

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचा शिंदे गटात प्रवेश

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांनी आज (दि.४) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे.

मुंबईत वर्षा बंगल्यावर हा ऋषीकांत शिंदे यांनी काही कार्यकर्त्यांसोबत पक्ष प्रवेश केला. यावेळी नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले, झोपडपट्टी पुनर्वसन विकास राज्यमंत्री दर्जा विजय नाहटा, वाशी नवी मुंबई शिवसेना संपर्कप्रमुख माजी नगरसेवक किशोर पाटणकर तसेच घणसोली विभागातील ऋषिकांत शिंदे यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्तेसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

शिंदे – फडणवीसांकडून महाविकास आघाडीला खिळखिळे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नाशिक मधील ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष व पाच नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकूण राज्यामध्ये शिंदे गटाची रणनिती यशस्वी होताना दिसत आहे.

 हे ही वाचा :

अक्षय भालेराव या तरूणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून – प्रकाश आंबेडकर

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र हादरला : गावात भीम जयंती साजरी करता का?’ असा सवाल करत दलित तरूणाची हत्या

युवक/युवतींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी ! मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आहे तरी काय ? वाचा सविस्तर !

राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडेसह हे आहेत अधिकारी!

Related Articles

- Advertisement -

Latest Articles