Wednesday, February 12, 2025

पिंपरी चिंचवड : चिखली, शाहूनगर, शिवतेजनगर मध्ये सावित्रीच्या लेकींनी केली वटपौर्णिमा साजरी

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : दि.०३ – महिलांच्या आनंदाचा सण वटपौर्णिमा आज शहरातील माता भगिनींनी सात फेरे घेऊन एकमेकांना शुभेच्छा देऊन साजरा केला. पतीला दीर्घायुष्य मिळावे, सकल जनांना वटवृक्षाची आरोग्यदायी सावली मिळू दे, अशी प्रार्थना करून वटवृक्षाची पूजा सामूहिक फेरे घालून करण्यात आली.

शिवतेजनगर- चिंचवड

शिवतेजनगर, चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ मंदिर शिवतेज नगर या ठिकाणी मंदिराच्या समोर असलेल्या वटवृक्षाची पूजा करण्यासाठी मोठया प्रमाणावर महिलांनी गर्दी केली होती. यावेळी महिला मंडळाच्या उपाध्यक्षा अंजली देव, कार्याध्यक्ष सारिका रिकामे, महिला भजनी मंडळाचे अध्यक्ष देवकाकू, नीलिमा भंगाळे, प्रीती झोपे, केतकी वझे, माही चौरे आदी सेवेकरी महिलांनी उखाणे घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या.



शाहूनगर-चिंचवड

शाहूनगर चिंचवड येथे आधार महिला मंडळाच्या माताभगिनींनी वटवृक्षाची पूजा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सुप्रिया चांदगुडे यांच्यासह द्वारका बरगुडे, रत्नमाला कदम, वैशाली खैरनार, अमृता धुमाळ, पूनम खुपेकर, स्नेहल चांदगुडे, योगिता येळवंडे,अलका आखाडे, प्रेमा गवळी, सुप्रिया रेडेकर यांनी पारंपारिक गाणी सादर करून वटवृक्षाचे बहुउपयोगी महत्व प्रकट केले.



चिखली-जाधववाडी

जाधववाडी, चिखली येथे मुख्य रस्त्यावरील जुन्या वटवृक्षाची पूजा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मैना भांगे, नंदिनी पाटील, नंदा भांगे, प्रमिला घोरपडे, कुटे वहिनी यांनी वटवृक्षाची कधीही फांदी तोडणार नाही, अशा भावना व्यक्त करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles