Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआंदोलक पैलवान त्यांचे पदक गंगेत करणार विसर्जित

आंदोलक पैलवान त्यांचे पदक गंगेत करणार विसर्जित

दिल्ली : भाजपाचे आमदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sigh) यांच्या विरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू (wrestlers) केंद्र सरकारचा निषेध म्हणून त्यांचे पदक गंगेत विसर्जित करणार आहेत. पदक गंगेत विसर्जित केल्यावर इंडिया गेटवर उपोषण करणार आहेत.

पैलवान विनेश फोगाटने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. मंगळवारी ( 30 मे) सर्व आंदोलक पैलवान आपले मेडल संध्यकाळी सहा वाजता हरिद्वार येथे गंगा नदीत विसर्जित करणार आहेत. दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारावाईनंतर दोन दिवसांनी विनेश फोगाटने हा निर्णय घेतला आहे.



गंगा नदीत पदक विसर्जित केल्यानंतर आमच्या आयुष्यात करण्यासारखे काही उरलेच नाही. त्यामुळे आम्ही इंडिया गेटवर आमरण उपोषण करणार आहे. राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध इंडिया गेटवर युद्धात भारतीय सेनेच्या सैनिकांना जीव गमवावा लागला त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारले होते. आम्ही त्यांच्याइतके महान नाही परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना आमची भावना देखील त्या सैनिकांप्रमाणेच होती.

संबंधित लेख

लोकप्रिय