Thursday, February 13, 2025

व्हिडिओ : अबब चक्क १६ वाघ एकत्र , शिकारीसाठी नव्हे तर “या” कारणासाठी

गुजरात : सोळा वाघांना एका ओळीत पाणी पिताना पाहिले का ? मित्रांनो हा व्हिडिओ आहे गीर अभयारण्यातील वाघांचा. भारतामध्ये प्रचंड उकाडा जाणवत आहे. त्यात तापमानाने चाळीशी पार केली आहे ,अशातच जंगलाचा राजा आणि देशाचा राष्ट्रीय प्राणी असलेला वाघ कळपाने एकत्र पाणी पीत आहे. गीर अभयारण्यात टिपलेले हे दुर्मिळ दृश्य खास आपल्यासाठी.



गीर अभयारण्य विषयी थोडक्यात माहिती

गीर वन राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य , यांना सासण गीर म्हणून ओळखले जाते. हे भारताच्या, गुजरात राज्यामधल्या तलाला तालुक्यातील वन आणि वन्यजीव अभयारण्य आहे. हे ठिकाण सोमनाथ मंदिराच्या ईशान्येला ४३ किलोमीटरवर, जुनागढपासून ६५ किमीवर व अमरेलीच्या नैर्ऋत्येला ६० किमी अंतरावर आहे. हे काठेवाड-गीर या वाळवंटी जंगलांचा भाग आहे. ह्या जंगलाला १९९५ साली अभयारण्याचा दर्जा मिळाला. ह्याचे क्षेत्रफळ सुमारे १४१२ चौरस किमी असून, पैकी २५८ चौरस किमी पूर्णतः राष्ट्रीय उद्यान व १,१५३ चौ. किमी वन्यजीव अभयारण्य म्हणून संरक्षित आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles