Wednesday, February 12, 2025

एक हात मदतीचा ; बुधवार पेठेतील महिलांसाठी मंथन फाउंडेशन व महा एनजीओ फेडरेशनचा उपक्रम

पुणे / क्रांतीकुमार कडुलकर : शेखर मुंदडा यांच्या प्रेरणेने आणि भगीरथ तापडिया ट्रस्ट यांच्या सहाय्याने व महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून बुधवार पेठेतील “मंथन फाउंडेशन” संस्थेशी जोडल्या गेलेल्या ९० एचआयव्ही सह जगणाऱ्या महिलांना एक महिना पुरेल इतके राशन किट चे वाटप करण्यात आले. हा उपक्रम १५ ऑगस्ट २०२२ पासून प्रत्येक महिन्यात चालत आलेला असून संपूर्ण एक वर्ष चालू ठेवण्याचा महाएनजीओ फेडरेशनचा मानस आहे. या पोषण आहार किट मध्ये गहू, डाळ, सोयाबीन, तांदूळ, तेल, राजगिरा लाडू, मटकी इत्यादी पौष्टिक आहाराचे पदार्थ समाविष्ट केलेले असून एचआयव्ही रुग्णांच्याच्या मूलभूत गरजांचा विचार करण्यात आलेला आहे.



कार्यक्रमादरम्यान मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांनी मंथन संस्थेच्या कामाबद्दलची सविस्तर माहिती दिली. तसेच वारंगना व्यवसायातील स्त्रियांच्या समस्या देखील मांडल्या. समाजातील विविध घटक एकत्र येऊन काय विधायक काम करता येईल यावरही चर्चा करण्यात आली. पोषण आहार किट वाटप कार्यक्रमनंतर महा एनजीओ फेडरेशनच्या टीमने वस्तीमधील काही महिलांशी त्यांच्या घरात जाऊन प्रत्यक्ष सवांद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. प्रत्येकीची व्यथा आणि रोजचं जीवन जगण्याची धडपड बघून सर्वजण सामाजिक परिस्थिती बद्दल अधिकच जागरुक झाले आहेत. हा सामाजिक उपक्रम सर्वांसाठी एक आदर्श घालून देणारा व प्रेरणादायी आहे.


मंथन फाउंडेशन व महा एनजीओ परिवारातर्फे आम्ही भगीरथ ट्रस्ट, राजेंद्र तापडिया व अंजली तापडिया यांचे ऋणी आहोत. भगीरथ तापडिया यांच्या वतीने श्रीसिंह व विक्रम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी महा एनजीओ फेडरेशन चे संचालक मुकुंद शिंदे, कार्यकारी संचालक अक्षयमहाराज भोसले, प्रशासकीय अधिकारी राहुल जगताप तसेच CSR हेड पायल मुजुमदार हे उपस्थित होते. आभार कविता सुरवसे मंथन फाउंडेशन प्रकल्प व्यवस्थापक यांनी केले. सर्व मंथन टीमने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles