Wednesday, February 12, 2025

लोक कल्याण आधार मंचाच्या वतीने बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन

ओतूर / रफिक शेख : लोक कल्याण आधार मंच संस्थेचे राज्य संस्थापक अध्यक्ष प्रमोद भानुदास शितोडे यांनी गुरूवारी ओतूर येथील महिला बचत गटांना भेट दिली. यावेळी त्यांनी बचत गटाच्या महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

लोक कल्याण आधार मंचाच्या माध्यमातून ग्राहक जन जागृती मोहिम राबविणे, आरोग्य शिबिर, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, विविध जिल्हा परिषद व शासकीय योजना सर्व शेतकरी वर्गासाठी माहिती पोहचविणे, आठवड्या बाजार मधील होणाऱ्या व्यापारी फसवणूकीला आळा घालणे याबाबत मार्गदर्शन करणे व माहिती सांगणे, ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र सुरू करणे याची माहिती देण्यात आली. यासोबतच महिलांना नियुकती पत्र देण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे संघटनेचे अध्यक्ष प्रमोद भानुदास शितोळे व संघटक नितीन थोरात, पुणे जिल्हा उपाध्यक्षा प्रतिभा लांडे, सुनंदा ढमाले, पुष्पा वाघमारे, रीना खरात, छाया रवींद्र अल्लाट आदी उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles