Friday, December 27, 2024
Homeराजकारणया दोन्ही पक्षांनी खंजीर हे निवडणूक चिन्ह ठेवायला काय हरकत आहे? भाजपची...

या दोन्ही पक्षांनी खंजीर हे निवडणूक चिन्ह ठेवायला काय हरकत आहे? भाजपची टीका

मुंबई : नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा २२ वा वर्धापन दिन संपन्न झाला. त्या निमित्ताने बोलताना शरद पवार यांनी शिवसेना हा विश्वासू पक्ष असल्याचे म्हंटले, तसेच हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात असली तरी हे सरकार पाच वर्ष टिकेलच आणि लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

 

 यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे की, विश्वासघात हाच ज्यांच्या राजकारणाचा मूलमंत्र राहिला आहे, ते शिवसेनेवर लोकांचा विश्वास असल्याचे सांगतायत. खरंतर या दोन्ही पक्षांनी खंजीर हे निवडणूक चिन्ह ठेवायला काय हरकत आहे? असे ट्विट करत टोला लगावला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय