रत्नागिरी : सुशिलकुमार पावरा यांनी राज्याध्यक्ष युवा आघाडी महाराष्ट्र बिरसा क्रांती दल पदाचा आज दिनांक 15 जून 2021 रोजी सकाळी 7.00 वाजता राजीनामा दिला आहे. राजीनामा पत्र संस्थापक अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांना सही करून पाठवून दिले आहे. अचानकपणे दिलेल्या राजीनाम्यामुळे नवीन कार्यकर्ते यांना धक्का बसला आहे व कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
राजीनाम्यात सुशिलकुमार पावरा यांनी कारणे लिहिली आहेत. निशा पावरा आदिवासी महिला कर्मचारी यांना नंदुरबार येथील भाजप नगरसेवकाकडून मारहाण प्रकरणात आम्ही निवेदन दिली म्हणून संघटनेतीलच काही पदाधिकारी विरोध करत आहेत. जिल्हाधिकारी नंदुरबार डाॅ. राजेंद्र भारूड यांच्या चांगल्या कामाचे समर्थन केले म्हणून संघटनेतीलच काही पदाधिकारी यांनी विरोध केला, भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने माझ्या कुटुंबाने अभिवादन केले म्हणून अल्टा अंगठा दाखवून विरोध करू लागले, पुणतांबा येथील 122 बेघर आदिवासी भिल्ल कुटुंबांना न्यायासाठी निवेदन देऊन आंदोलन आयोजित केले म्हणून विरोध करू लागले व शेवटी खालच्या स्तरावर येऊन माझी वैयक्तीक बदनामी वाॅटसपवर करणे सुरू केले आहे. आपले संघटन उध्वस्त करण्याचे कुणाचे तरी षडयंत्र व डाव दिसत आहे व बिरसा क्रांती दल संघटनेचे काम उत्तम सुरू असताना व संघटना झपाट्याने वाढवत असताना आपल्या संघटनेतीलच काही लोक माझे पाय खेचत आहेत. मला संघटनेच्या पदापेक्षा समाजाची कामे व समाज महत्वाचा आहे.म्हणून आज दिनांक 15 जून 2021 रोजी मी राज्याध्यक्ष युवा आघाडी बिरसा क्रांती दलाचा राजीनामा देत आहे, असे पावरा यांनी म्हटले आहे.
शेवटचा निर्णय आमचे 57 तालुका व जिल्हा शाखा घेतील तो मला मान्य असेल. तरी राजीनामा स्वीकारावा व कुणाला तरी सन्मानपूर्वक हे पद देण्यात यावं, हिच नम्र विनंती, असे राजीनाम्यात सुशिलकुमार पावरा यांनी म्हटले आहे.
पावरा पुढे म्हणाले, मी बिरसा क्रांती दलात आलो तेव्हा फक्त बिरसा क्रांती दल विदर्भातील 2-3 जिल्ह्यात कार्यरत होती. मी बिरसा क्रांती दलात आल्यानंतर कोकण विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग व मराठवाडा विभागात संघटनेचा विस्तार झपाट्याने व्हायला लागला.या विभागातील ब-याच शाखा मी माझ्या मित्रांच्या सहकार्याने तयार केल्या असून माझ्या वर विश्वास ठेवून नवीन कार्यकर्ते संघटनेत आलेले आहेत. 57 शाखांच्या पदाधिकारी यांनी विनंती केली म्हणून मला दशरथ मडावी यांनी राज्याध्यक्ष युवा आघाडी महाराष्ट्रचे पद दिले. पद स्वीकारल्यानंतर आत्मविश्वासाने काम सुरूच ठेवले व सुरूच आहे.संघटनासुद्धा वाढत आहे. परंतु संघटना वाढत असताना कुणाची तरी नजर लागली आहे. अख्खा संघटना बिरसा क्रांती दलात येत आहेत हे बघून काही लोक संघटना संपवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
संस्थापक अध्यक्ष यांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी राज्य कार्यकारिणी बरखास्त करून आम्हाला कार्य सुरू ठेवण्याच्या सुचना दिल्या. आमचं कार्य सुरू असताना पुन्हा बदनामी कारण पोस्ट संघटनेतील पदाधिकारी टाकू लागले.कार्यकर्ते यांना भडकवू लागले. मी व माझे सहकारी याबाबत संस्थापक अध्यक्ष मा दशरथ मडावी यांच्या कडे तक्रार केली. यावर लवकरच निर्णय होईल. असे ते बोलले आहे. तरी ज्या ठिकाणी आपला सारखा अपमान होत असेल व बदनामी होत असेल अशा ठिकाणी न राहिलेले बरे.
57 शाखा व 3 संघटना मिळून यापूर्वी सुद्धा नवीन संघटना स्थापन करू शकले असते. परंतु आम्ही समाजासाठी एकत्र राहू हा विचार ठेवून गप्प राहत संघटन वाढीचे काम सुरूच ठेवले. आता काही गोष्टी अती झाल्या आहेत. त्यावर वरिष्ठ आवर घालत नसतील तर आम्हाला नाईलाजाने निर्णय घ्यावा लागणार आहे.
बिरसा क्रांती दलाच्या 57 शाखांना राज्यस्तरीय एक पद सन्मानपूर्वक मिळत नसेल तर त्या 57 शाखांना महत्व दिले जात नाही असा त्याचा अर्थ होतो. मी युवा राज्याध्यक्ष पदासाठी लाचार नाही. कारण मी स्वतः चे अस्तित्व स्वतः तयार केले आहे. तसे समाजकार्य करतो. कुठलीही संघटना मला सहज चांगल्या पदावर घेईल. तरीही आपण आता 57 शाखा पदाधिकारी जो निर्णय घेतील त्याप्रमाणे पुढे जाऊ असे सुशिलकुमार पावरा यांनी सांगितले आहे. त्यामुळे सुशिलकुमार पावरा व 57 शाखा पदाधिकारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.