Wednesday, February 12, 2025

विषमुक्त शेती काळाची गरज – कृषिरत्न अनिल मेहेर

डिसेंट फाउंडेशन चा शेतकऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम

जुन्नर / आनंद कांबळे : दिवसेंदिवस शेतीतून जास्त उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक खते व औषधांचा वापर वाढत आहे. परंतु अशा उत्पन्नाचा मनुष्याच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे विशेषतः तरुण शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करताना जैविक खते व औषधांचा वापर करावा, असे मत कृषिरत्न अनिल मेहेर यांनी व्यक्त केले.

जुन्नर येथील पंचायत समितीच्या जिजामाता सभागृहात डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून डायमाईन्स अँड केमिकल लिमिटेड व एम.एन. मेहता चॅरिटेबल ट्रस्ट व भारत कृषी सेवा संस्थेच्या सहकार्याने शेतकऱ्यांना मोफत औषध फवारणी बॅटरी पंप व जैविक औषध किट वाटप कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिल तात्या मेहेर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

याप्रसंगी जुन्नर तालुक्यातील जवळपास पन्नास शेतकऱ्यांना औषध फवारणी साठी लागणारे बॅटरी पंप व पंच्याहत्तर शेतकऱ्यांना जैविक औषधाचे किट मान्यवरांच्या हस्ते मोफत वाटण्यात आले.

या कार्यक्रमास कृषीरत्न अनिल तात्या मेहेर, अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष कृषीभूषण श्रीराम गाढवे, डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक कृषीभूषण जितेंद्र बिडवई, भारत कृषी सेवा संस्थेचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट वीरभद्र गोगे, आर एन डी ऑफिसर डॉक्टर शुभांगी नारकर, ठिकेकर वाडीचे आदर्श सरपंच संतोष ठीकेकर, ऍग्रो सोल्युशन्स कंपनीचे अनिल बिराडे, मंडल कृषी अधिकारी डी. एस. जाधव, कृषी अधिकारी बाप्पू रोकडे विठ्ठलवाडी चे सरपंच आदिनाथ चव्हाण, डिसेंट फाऊंडेशनचे सचिव एफ.बी. आतार, नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ डॉक्टर दत्ता गावडे, लेण्याद्री देवस्थानचे विश्वस्त जयवंत डोके, सदाशिव ताम्हाणे, सुरेश वाणी, प्रकाश नवले, अजित चव्हाण, दिलीप भगत, योगेश वाघचौरे आदी मान्यवर व शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डिसेंट फाऊंडेशनचे सामाजिक उपक्रम खूप उपयोगी आहेत. औषध फवारणीसाठी सुरक्षा किट, शाळेतील मुलांसाठी स्वच्छता किट, वृद्धांसाठी आधाराची काठी, दिव्यांग बांधवांसाठी तीन चाकी सायकल वाटप निश्चित फायदेशीर ठरत आहे. त्याचबरोबर संस्थांच्या माध्यमातून औषध फवारणी, बॅटरी पंप व जैविक औषधकीट शेतकऱ्यांना लाभदायी ठरणार आहे. शेतकऱ्यांनी जैविक खते व औषधांचा वापर आपले आरोग्य सांभाळण्यासाठी करावा, असेही शिंदे राळेगण चे बाळासाहेब खिलारी म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र बिडवई यांनी तर सूत्रसंचालन फकीर आतार आदिनाथ चव्हाण यांनी आभार व्यक्त केले . कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

हे ही वाचा :

जुन्नर : बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरणी एकास अटक तर २० जणांवर गुन्हा दाखल

जुन्नरच्या पेशवेकालीन शाहीर समाधी मंदिरातील “पदचिन्ह” दुर्लक्षित

जुन्नर : बेलसर ते भिवाडे दरम्यानचा रस्ता खड्डेमय; धुळ व खडीचा वाहनचालकांना त्रास

कादरीया वेलफेअर सोसायटी तर्फे सामुदायिक विवाह संपन्न

धक्कादायक : शौचालयाचा टँक साफ करताना एकाच घरातील पाच कामगारांचा गुदमुरून मृत्यू

Related Articles

- Advertisement -

Latest Articles