Wednesday, February 5, 2025

पुणे : घरेलु कामगार महिलांची कामगार आयुक्त कार्यालयावर तीव्र निदर्शने

पुणे, दि. १६ : आज पुणे येथे आंतरराष्ट्रीय घरेलु कामगार दिनाच्या निमित्ताने अपर कामगार आयुक्त कार्यालय येथे घरलू कामगार महिलांनी एकत्र येऊन सीटू संलग्न पुणे जिल्हा घरकामगार संघटनेच्या वतीने निदर्शने केली. या निमित्ताने आयुक्तांना निवेदन सादर केले.

यावेळी घरेलू कामगार महिलांना मिळणाऱ्या १,५०० रुपये अर्थसाहाय्य योजनेसाठी ३,००० पेक्षा अधिक फॉर्म जमा केले. तसेच निवेदन देऊन शिष्टमंडळाने अर्थसहाय्य मिळण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा आणि ६० पेक्षा अधिक वय असलेल्यांना १,५०० रुपये लाभ मिळावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनात सीटूचे जिल्हा अध्यक्ष कॉ. अजित अभ्यंकर, जिल्हा सचिव कॉ. वसंत पवार, राज्य सचिव कॉ. शुभा शमीम, जिल्हा सहसचिव मोहन पोटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

यावेळी घरकामगार संघटनेच्या अध्यक्ष किरण मोघे, सचिव सरस्वती भांदिर्गे, खजिनदार रेखा कांबळे, सहसचिव हिराबाई घोंगे, संगीता केंद्रे, अपर्णा दराडे, शकुंतला वस्माने, उपाध्यक्ष सुभद्रा खिलारे, पद्मा शिंदे, जकिया तत्तपुरे, शांता नाईक व इतर कार्यकर्त्या आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 


Related Articles

- Advertisement -

Latest Articles