Wednesday, February 5, 2025

डहाणू डेहणे येथे झालेल्या फटाका कंपनीच्या स्फोटकाच्या घटनास्थळी आ. निकोले यांची प्रत्यक्ष पाहणी

जखमी व नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देणार

डहाणू, दि. 17 : डहाणू डेहणे-पळे येथे झालेल्या फटाका कंपनीच्या स्फोटकाच्या घटनास्थळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांची प्रत्यक्ष पाहणी केली असून जखमी व नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देणार असल्याचे निकोले यांनी आश्वस्त केले आहे.

डहाणू डेहणे-पळे येथील फटाका कंपनीत आग लागून मोठा स्फोट झाला या स्फोटांचे हादरे 10 ते 15 किलोमीटर पर्यंत जाणवली त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. याची सर्व प्रथम आमदार कॉम्रेड विनोद निकोले प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पोहचले व लगेच रुग्णवाहिका, अग्निशामक दल आदी यंत्रणा सज्ज केली. तद्नंतर या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात पाठविले. तर अती गंभीर असलेल्या  इसमास गुजरात येथील वापी मधील हॉस्पिटल मध्ये स्थलांतरित करण्यात आले. स्फोट मुळे नुकसान झालेल्या अनेक घरांचे पत्रे उडाले, काचा फुटल्या या सर्वांचा खर्च सदरहू कंपनीने घ्यावा असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी सांगितले, अन्यथा याविषयी येत्या पावसाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करू.

यावेळी माकपचे कॉ. चंद्रकांत घोरखाना, कॉ. रडका कलांगडा, डॉ. आदित्य अहिरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक नलावडे, एटीएसचे अधिकारी, प्रांताधिकारी अस्मिसा मित्तल, तहसीलदार राहुल सारंग, कॉ. हरिश्चंद्र गहला, कॉ. विजय दांडेकर, कॉ. दत्ता भोंडवा, कॉ. उल्हास भोंडवा, कॉ. दत्तू दुमाडा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles