जुन्नर (पुणे) : वाढत्या महागाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दि.१७ जून २०२१ रोजी जुन्नर तहसिल कार्यालयावर सायकल रॕली काढून मोर्चा काढण्यात आला. यावेळी जुन्नर तहसिलचे नायब तहसिलदार सचिन मुंढे यांना वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निवेदन देण्यात आले. आपल्या मागणीचा शासन दरबारी अहवाल सादर करु, असे आश्वासन नायब तहसिलदार मुंढे यांनी दिले.
पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, घरगुती गॕस इ. जीवनावश्यक वस्तुंच्या भावामध्ये भरमसाठ दरवाड झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये संतापाची लाट दिसुन येत आहे. आधीच कोरोना महामारीने मेटाकुटीस आलेल्या सामान्य नागरिकांचे वाढत्या महागाईने कंबरडे मोडले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी जुन्नर तालुक्याच्या वतीने जुन्नर नविन बसस्थानक ते तहसिल कार्यालय असा सायकल रॕली मोर्चा आयोजित केला होता.
धान्यबाजार येथे निषेध सभा घेण्यात आली. यावेळी राकेशभाऊ डोळस, जावेद मोमीन, जुबेर शेख, गणेश वाव्हळ, सागर जगताप, निलम खरात, पुनम दुधवडे, संतोष डोळस यांनी तीव्र शब्दांत केंद्र व राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.
जुन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन तसेच शासनाच्या नियमांचे पालन करुन आंदोलन करण्यात आले. सुत्रसंचालन सागर जगताप यांनी, तर आभार निलम खरात यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष परीश्रम घेतले.
यावेळी गिरिराज वाव्हळ, सागर जगताप, महेश तपासे, गौतम दुधवडे, शांताराम घोडे, निलम खरात, प्रियांका वाव्हळ, फिरोझभाई पटेल, मंदार कोळंबे, अल्पेश सोनवणै, सिद्धार्थ भालेराव, प्रकाश सोनवणे हे उपस्थित होते.