Saturday, March 15, 2025

शिवाजी विद्यापीठाच्या वार्षिक नियकालिके स्पर्धेत वारणा अंकाला ११ पारितोषिके

वारणानगर : येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या वारणा २०१९- २० मधील वार्षिक नियतकालिक स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाची ११ पारितोषिके प्राप्त झाली आहेत. या यशाबद्दल श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे- सावकर, प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. वासंती रासम, प्रभारी प्राचार्य डॉ.प्रकाश चिकुर्डेकर यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि संपादक मंडळाचे अभिनंदन केले आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या आणि कोरोना मध्ये जीवाची परवा न करता डॉक्टर नर्स पोलीस सफाई कामगार यांनी केलेल्या अतुलनीय बद्दल त्यांना समर्पित केलेल्या या विशेष अंकासाठी विद्यापीठाने नुकताच निकाल घोषित केला. गेली २७ वर्षे सातत्याने यशाचा चढता आलेख नियतकालिकाने याही वर्षी कायम ठेवला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकासह अनेक पारितोषिके “वारणा”, नियतकालिकाने वेळोवेळी प्राप्त केली आहेत.

विशेष म्हणजे हिंदी विभागाने याही वर्षी पाच पारितोषिक प्राप्त केली आहेत. प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी संपादित केलेल्या हिंदी विभागातील विविध विषयातील लेखना पाच पारितोषिके पारितोषिके प्राप्त झाली आहेत. मराठीमध्ये दोन, हिंदी विभागाला पाच,इंग्रजीमध्ये एक, विज्ञान विभागात दोन आणि कला -कौशल्य विभागात एक अशी एकूण ११ पारितोषिके घोषित झाली आहेत. रोख रक्कम शिवाजी विद्यापीठाचे प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.

हिंदी विभागात कु. अश्विनी जाधव हिने ‘डॉ. श्रीराम लागू एक महान चरित्र अभिनेता’, व्यक्तिचित्रण रेखाटले आहे त्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. कु. स्वाती वडर हिने’जल ही जीवन’, वैचारिक लेख लिहिला आहे त्यालाही प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. अरुण शिंदे यांने माहिती पर लेख विज्ञानावर आधारित लिहिलेल्या ‘तुलसी’ वनस्पती चे महत्व ला द्वितीय पारितोषिक तर कु. दर्शना काळे हिने लिहिलेल्या आणि बदलत्या ग्रामीण जीवनाचे चित्रण करणाऱ्या ‘दस बरस के बाद’, या प्रवासवर्णनाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. सैनिक जीवनावर कोमल बादरे हिने लिहिलेल्या ‘मैं सैनिक’, कवितेला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.

मराठी विभागाचे संपादन डॉ. बी.के.वानोळे यांनी केले असून कु. शिवानी घोंगडे हिने लिहिलेल्या ‘आजी एक अक्षय ऊर्जा’, पुस्तक परीक्षणाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. ‘गांधी आणि गांधीवाद’, संशोधन पर लेखाला तृतीय क्रमांक तर विज्ञानावर आधारित ‘निसर्गातील बदल एक चिंतन’, या लेखाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.इंग्रजी विभागाचे संपादन डॉ. दिनेश सातपुते यांनी केले असून कु. साक्षी बच्चे हिने लिहिलेल्या पारंपारिक बियाणांची जपणूक करणाऱ्या ‘राहीबाई पोपीरे’, यांच्या चरित्र -चित्रणाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.

विज्ञान विभागाचे संपादन प्रा. व्ही. एस. पाटील यांनी केले असून कु. श्रुतिका जोशी हिने लिहिलेल्या ‘गुगल माझा गुरु’, या माहिती परत लेखनाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. कला कौशल्य विभागातून सुजय नायकवडी यांनी ‘कॅमेऱ्याची नवलाई’, अंतर्गत काढलेल्या विविध छायाचित्रांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.अंकाच्या संपादन समितीत डॉ. एस. एस. जाधव, डॉ .आर. बी.पाटील, डॉ. प्रीती शिंदे- पाटील, प्रा. बी. डी. आभ्रंगे, प्रा. सौ. वर्षा रजपूत यांनी संपादन सहाय्य केले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles