कोल्हापूर : महात्मा गांधी यांचे नातू, लेखक, तसेच सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अरुण मणीलाल गांधी (89) यांचे मंगळवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.अरुण गांधी यांच्यावर करवीर तालुक्यातील नांदवाळ रोड येथील वाशीच्या गांधी फाऊंडेशनच्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे पुत्र तुषार गांधी उपस्थित होते.
कोल्हापुरात आल्यानंतर आजारपणामुळे गेल्या दोन महिन्यांपासून येथील ‘अवनी’ संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या करवीर तालुक्यातील हणबरवाडी येथील घरी वास्तव्यास होते.
मणीलाल गांधी यांचे ते पुत्र असून, 4 एप्रिल 1934 रोजी डर्बनमध्ये त्यांचा जन्म झाला होता. 1987मध्ये कुटुंबासह ते अमेरिकेत स्थायिक झाले होते. तेथे त्यांनी विद्यापीठात अहिंसेशी संबंधित एक संस्थाही स्थापन केली. आजोबा महात्मा गांधी यांच्याप्रमाणे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत त्यांचे मोठे योगदान होते. ‘द गिफ्ट ऑफ अँगर ः अॅण्ड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रॅण्डफादर महात्मा गांधी’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तक आहे.
महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन
- Advertisement -