Saturday, March 15, 2025

मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरपाठोपाठ मुंबईतील घरावर ईडीचा छापा

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानापाठोपाठ आता मुंबईतील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापा टाकला असून देशमुखांच्या दोन्ही निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरू आहे.

११ मे रोजी ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दुसरीकडे सीबीआयनेही अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरु आहे. 

गुरूवारी रात्रीच ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झाले होते त्यानंतर सकाळी ८ वाजताच ईडीचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरी दाखल झाले. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू झाली आहे. मात्र, अनिल देशमुख सध्या पुण्यात असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, २१ एप्रिल रोजी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (CBI) ने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता, त्यावेळी त्यांची सलग ११ तास चौकशी करत देशमुखांच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू सीबीआयने ताब्यात घेतल्या होत्या. 

Related Articles

- Advertisement -

Latest Articles