Saturday, March 15, 2025

विशेष लेख : सोडलं ‘ती’ ने आईला दोन दिवसाच्या प्रेमासाठी….!

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

आई जिच्या नावामधे स्वर्ग असतो. जी नऊ महिने नऊ दिवस त्या बाळाला जपुन जन्म देते. पण काय होत, की तीचं मुलगी आईला सोडुन दुःख देऊनी एका मुलासाठी सोडून जाते.

एका आईने दुःख सहन करुन मुलीला जन्म दिल. खुप छान जपलं हो तीला पण काय झाल त्या मुलीने सोडलं आईला……आईने एका मुलीला जन्म दिला म्हणून बापाने सोडलं त्यांना कारण त्यांना मुलगा हवा होता. मग काही दिवसांनी मुलगा झाला. पण मुलगा सर्वांना सोडून गेल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला. वडीलानी साथ सोडली कारण त्यांना मुलगी नाही तर मुलगा हवा होता. पण आईने दुःख सहन करुन रक्ताच पाणी करून लहानच मोठं केलं समाजात एकट्या स्त्री ला किती तोंड द्यावं लागतं हे आपण जाणतो तरीही तिने मुली साठी कुणाचीही पर्वा न करता मुलीला साभाळलं …..सुखात ठेवलं नेहमी तीने एकच प्रत्यन केली की, माझ्या म्हातारपणाची काठी कशी सुखात असावी जी वेळ माझ्या वर आली ती माझ्या मुलीवर येऊ नये म्हनून तिने कष्ट केले मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले……

आई दुःख सहन करुन नोकरी करायला लागली….काही दिवसांनी मुलीला एक ऑनलाईन भाऊ लाभला….तो पण जिवापाड प्रेम करुन जपणारा स्वतला चार सख्या बहिणी असूनही तो हिला जपायचा स्वतःच्या सख्या बहिणीपेक्षा ही जास्त प्रेम केलं भावाची कमी कशी पूर्ण करता येईल हे एकच ध्येय त्याने समोर ठेवले नेहमी….. पण काय मुलीला एका मुलाशी ऑनलाईन प्रेम झालं. जेंव्हा ही गोष्ट आईला समजली तेंव्हा खरतर आईच्या पायाखालची जमीन सरकली, पण तेथेही ऑनलाईन भावाने सर्व गोष्टी समजावून व्यवस्थित केल्या. 

त्यांचं आयुष्य पुन्हा छान चालल होत. पण कुणास ठाउक परत काय झालं अचानक 4 ते 5 माहिन्यानंतर पुन्हा ते दोघे एकत्र आले. आणि एक दिवस रात्री 1 वाजता अचानक आईला जाग आली समोर बघते तर काय मुलगी पळून जायची तयारी करत होती. 

आईने खरतर छातीवर दगड ठेवून तिला समजवल ऑनलाईन नात असलेल्या भावाने समजवण्याचा प्रयत्न केला तिने भावाशी आईशी बोलण बंद केलं. पंधरा दिवस आणि अचानक एक दिवस आई कामाला गेली असता दुपारी घरात आजीला सांगून गेली की मी शेजारी जाऊन येते, आणि तिथून त्या मुकासोबत पसार झाली, मग काय मुलीने सोडल आईला आणि त्या भावाला ज्याने तीला रक्ताच्या नात्यापैक्षा जास्त प्रेम केलं रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त महत्व दिल …..आईने काय कराव? आणि त्या भावाने काय करावं?ज्या नात्याला ती काळजात जपत होती.आज तीला ते नात काय वाटलं…….आई, भाऊ याचं काय चुकलं…….आईने नऊ महिने नऊ दिवस तीला जपलं, की त्या भावाने रक्ताच्या नात्यापैक्षा जास्त जपलं……..वाट आहे त्यांना त्या मुलीची,आणि त्या भावाला वाट आहे आपल्या त्या बहीणीची जी त्याला दादा म्हणून हाक मारायची सख्खा भाऊ त्याच्यात बघायची ………पण काय वाटते तुम्हाला खरंच दोन तीन महिन्याचा प्रेमासाठी आईच्या  प्रेमाचं महत्त्व नाही….की त्या भावाचं प्रेम ज्या भावाची कधीकाळी बहीण शपथ घेत असे……….

…. किती खाेल जखमा झाल्या असतील त्याच्या हृदयाला….

किती शब्द टोचले असतिल निष्पाप त्याच्या मनाला….

प्रेम बहिणीचं इतकं फालतू निघालं…

किती त्रास झाला असेल त्याच्या शांत डोळ्यांना…

सर्वांपेक्षा जास्त मानले जिला ,तिनेच तडा दिला  त्याच्या विश्वासाला….

अंत असाही जवळ असतो ,दाखवून दिले तिने तीच्या आईला….

अर्थच नाही राहिला आज  ,तिच्यासाठी केलेल्या त्यागाला……

 मला आजच्या तरुण पिढीसाठी दोन गोष्टी सांगाव वाटत आहेत

 

प्रेम आहे, खूपच प्रेम आहे म्हणणारे ,जीव सुद्धा देणारे, पळून जाणारे …अरे तुम्हाला आई वडिलांचं प्रेम नाही कळंल इतकी वर्ष सोबत राहून आणि ५ वर्षे नाही झाली, महिना पण नाही झाला. तेव्हा तुम्ही प्रेम आहे म्हणून आई वडिलांना दुखावून पळून जाता… जीव देता… त्यांनी तुमच्यासाठी केलेल्या कष्टाला मातीमोल करता…त्यांची इज्जत सोडा…पण त्यांच्या जगण्यातला अर्थच घेऊन जाता रे… सुधरा आणि भविष्य काहीतरी बनवा ज्याने आई वडिलांना आपल्या मुलाचा अभिमान वाटेल.. त्यांनी केलेल्या संस्कारावर गर्व होईल… बाकी तुम्ही ठरवा ..आई वडिलांनी जग दाखवलं, रडवायचं का‌.. त्याची मान उंच ठेऊन आपलं भविष्य घडवायचं…

– अविनाश शिंदे, देवळा 

   नाशिक

   

Related Articles

- Advertisement -

Latest Articles