Wednesday, February 5, 2025

चांदवड : झोपलेल्या नगरपरिषदेला स्मरणपत्रानंतर जाग येईल का?

चांदवड (सुनील सोनवणे) : चांदवड नगरपरिषदेला  मागील महिन्यात भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी व काही सामाजिक कार्यकर्ते यांनी शहरातील विविध समस्यांबाबत निवेदन दिले होते. मात्र यात काहीच कार्यवाही न झाल्याने आज पुन्हा स्मरणपत्र देण्याची वेळ नागरिकांवर आली.

शहरातील खालील समस्या तातडीने सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यात प्रामुख्याने घंटागाडी दररोज येणे अपेक्षित आहे, पाणीपुरवठा ३ ते ४ दिवसाआड होणे आवश्यक आहे, गटारींची साफसफाई व्हावी. रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या बाभळी तोडल्या जाव्या. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, शहरात जंतुनाशक फवारणी करावी अशा विविध समस्या मांडलेल्या आहेत.

यावेळी महेंद्र कर्डिले, अंकुर कासलीवाल, मुकेश आहेर, संजय चोबे, किशोर क्षत्रिय, महेश बोऱ्हाडे, प्रशांत दळवी, संकेत वानखेडे, वैभव जाधव आदी उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles