Thursday, February 6, 2025

भिमा साळुंके यांची बिरसा फायटर्स रास्तापूर गाव अध्यक्ष पदी निवड

बिरसा फायटर्सची नवीन गाव शाखा रास्तापूर गठीत

अहमदनगर : बिरसा फायटर्स गाव शाखा रास्तापूर गाव अध्यक्ष पदी भिमा साळुंके यांची निवड करण्यात आली आहे. दिनांक 06 जून 2021 रोजी गाव शाखा तयार करण्यासाठी रास्तापूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बिरसा फायटर्स गाव शाखा रास्तापूर  तयार करण्यात आली.

 

◆ गाव शाखा पुढीलप्रमाणे : गाव अध्यक्ष भिमा साळुंके, उपाध्यक्ष उमाजी पवार, महासचिव मच्छिंद्र रजपूत, कार्याध्यक्ष रविंद्र गायकवाड, कोषाध्यक्ष सुभाष खुरसणे, दिपक माळी सहसचिव, सल्लागार मच्छिंद्र पवार, महिला प्रतिनिधी विमल रजपूत, संंघटक ज्ञानेश्वर बर्डे, प्रसिद्धी प्रमुख रमेश सोनवणे इत्यादी याप्रमाणे गाव शाखा तयार करण्यात आली आहे.

नवीन गाव शाखेतील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य यांचे बिरसा फायटर्स चे संस्थापक अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी अभिनंदन केले आहे तसेच राज्याध्यक्ष मनोज पावरा, जिल्हाध्यक्ष नंदुरबार  साहेबराव कोकणी, राज्य प्रवक्ता रोहित पावरा, राज्य  महासचिव राजेंद्र पाडवी यांनीसुद्धा नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे खूप खूप अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. 


Related Articles

- Advertisement -

Latest Articles