जुन्नर (पुणे) : आज जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी के.बी.खोडदे यांनी भेटून चर्चा करुन मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
■ जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या मागण्या व चर्चा पुढीलप्रमाणे :
1. जुन्नर तालुक्यातील शिक्षकांनी शाळेत 100 टक्के उपस्थित रहावे. अशा तोंडी सूचना केंद्रप्रमुख मार्फत दिलेल्या आहेत. परंतु शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रानुसार राज्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये 50 टक्के उपस्थिती असताना जुन्नर तालुक्यात शंभर टक्के शिक्षक उपस्थिती का? याविषयी चर्चा केली व वरिष्ठ कार्यलयाशी विचार विनिमय करून 2 दिवसात 50 टक्के उपस्थिती बाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन देण्यात आले.
2. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने शिक्षकांना कोविडं कामातून कार्यमुक्त करण्यात यावे.
3. 10 ते 5 या शालेय वेळेत ऑनलाइन, ऑफलाईन अध्यापन करत असताना पूर्णवेळ शाळेतच न थांबता गृहभेटी करण्यास कोणतेही हरकत नसल्याचे सांगण्यात आले.
4 जे शिक्षक पेसा भागात बदली करून आलेले आहेत. परंतु त्याना एकस्तर वेतनातून लाभ देण्यात आलेला नाही. त्यांना लवकरच वेतन निश्चिती करून एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येईल असे सांगितले.
5. सेवा पुस्तक कॅम्प आयोजित करून सर्व नोंदी अद्यावत केल्या जातील.
6. शालेय पोषण आहार DBT योजनेसाठी पालकांचे बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यावर शिक्षक समितीच्या मागणीची दखल घेऊन जिल्हा परिषदेला पत्र व्यवहार करून प्रश्न सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले.
6 वरिष्ठ वेतनश्रेणीचे जमा झालेले प्रस्ताव 2 दिवसात जिल्हा परिषद पुणे येथे पाठविण्यात येतील असेही आश्वासन दिले.
यावेळी परिविक्षाधीन गटशिक्षणाधिकारी दिपक कोकतरे, कक्ष अधिकारी शिंगाडे, क्लार्क विवेक शिंदे श्रीमती शेळकंदे हे उपस्थित होते, तर जुन्नर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष बाळासाहेब लांघी, सरचिटणीस राजेश दुरगुडे, कार्याध्यक्ष तुषार डुंबरे, कोषाध्यक्ष नितिन नहिरे, जिल्हा उपाध्यक्ष नारायण मराडे, तालुका नेते नामदेव मुंढे, जिल्हा प्रतिनिधी विलास साबळे, उपाध्यक्ष कैलास मुठे, उपाध्यक्ष राजेंद्र गारे, बी, डी, गोडे, रामदास साबळे, सतीश बुळे, विठ्ठल जोशी, नामदेव कोकाटे हे उपस्थित होते.