Thursday, February 6, 2025

प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाचे प्रकाशन


डॉ.एन.डी.पाटील यांना शुभेच्छा व प्रकाशन 

इचलकरंजी ता.१४, समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य व विद्यमान अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील  १५ जुलै रोजी वयाच्या ९३ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांना समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने शाल व बुके देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘ प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाच्या जुलै २०२१ च्या अंकाचे प्रकाशनही प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरोज पाटील, प्रशांत पाटील, प्रसाद कुलकर्णी हे प्रमुख उपस्थित होते.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles