पुणे : आज रविवार दिनांक 18 जुलै 2021 रोजी राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटना, या आरोग्य सेवक संवर्गासाठी स्थापन झालेल्या पुणे जिल्हा शाखेची बैठक शरदचंद्रजी पवार सभागृह, पुणे जिल्हा परिषद, पुणे येथे पार पडली.
या बैठकीस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एस.एल. चव्हाण, राज्याध्यक्ष पुष्पराज राठोड, राज्य कार्याध्यक्ष गणेश दहिफळे, राज्य कोषाध्यक्ष प्रवीण भराड, बनकर जिल्हा प्रतिनिधी जालना तसेच पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व हिवताप विभागातील आरोग्य सेवक उपस्थित होते.
या वेळी आरोग्य सेवकांनी आपापले मनोगत व्यक्त करून कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी मांडल्या. यानंतर राज्य पदाधिकारी यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करून आरोग्य सेवकांचे सर्व प्रश्न शासन दरबारी मांडून सोडविण्याचे आश्वासन दिले.
■ पुणे जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
● अध्यक्ष – सचिन राखुंडे
● सचिव – दीपक राऊत
● कार्याध्यक्ष – जालिंदर साळुंके
● कोषाध्यक्ष – सुनील वाघमारे
● उपाध्यक्ष – दत्ता कंठाळे, संदीप कोल्हे
● संघटक – अनिल राठोड, युवराज चव्हाण
● संपर्क प्रमुख – अशोक नागरगोजे
तसेच उज्ज्वल सोनवणे (हवेली), नितिन रोटे (पुरंदर) बाळासाहेब पिसाळ (भोर), शफयुद्दीन काजी (वेल्हा), राहुल चोकलिंगम (मावळ), निलेश सोनावणे व उमेश काटे (खेड), गजानन दुतोंडे व दयानंद माने (शिरूर), सुनील पवार (जुन्नर) यांची जिल्हा / तालुका कार्यकारीणीवर निवड करण्यांत आली. उर्वरित जिल्हा तालुका पदाधिकारी निवडीचे अधिकार नवनियुक्त पदाधिकारी यांना देण्यात आले.