कन्नूर:केरळचा दक्षिणी भाग, अलपुढ्झा, कोट्टायम,कन्नूर या जिल्ह्यांमध्ये तापमानानं 54 अंशांचा आकडा गाठला आहे. तर, तिरुवअनंतपूरम, कोल्लम, एर्नाकुलन,कोझिकोडे या जिल्ह्यातील पारा 45 ते 54 अंशांमध्ये राहिल्यामुळे दैनंदिन जीवन कठीण झाले आहे.उष्णतेची प्रथमच मोठी लाट आल्यामुळे इथे दीर्घ काळासाठी इथं उष्माघाताचा त्रास अनेकांनाच होऊ शकतो. प्रशासनाच्या माहितीनुसार पुढील काही दिवस हीच परिस्थिती राहणार असल्यामुळे केरळच्या आरोग्य विभागाने लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
हवामान खात्याने गोव्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानंतर कडक उन्हामुळे गुरुवार आणि शुक्रवारी राज्यातील शाळा दुपारी 12 नंतर बंद ठेवण्याचे आदेश गोवा सरकारने दिले आहेत.
केरळमध्ये भीषण उष्णतेची लाट-पारा 54 अंश तापमानाने सरकार हादरले.
- Advertisement -