Friday, March 14, 2025

शेतकरी संतप्त, चक्क जात विचारून शेतकऱ्यांना खताची विक्री; सरकार वर्णभेद करतेय? अजित पवारांनी असे धरले धारेवर

मुंबई प्रतिनिधी । सुशिल कुवर

खत घेतल्यानंतर शेतकऱ्यांची जात विचारली जात असल्याचा संतापजनक प्रकार गेल्या तीन दिवसांपासून घडत आहे. या प्रकारावर शेतकरी संतप्त असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदाेलनाचा इशारा दिला आहे.

सांगली जिल्ह्यात रासायनिक खतांसाठी शासन कंपनीला अनुदान देते. ही सर्व प्रक्रिया ई-पाॅस मशिनवर हाेते. शेतकऱ्यांनी दुकानात जावून खत खरेदी केल्यानंतर नाव, माेबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक आणि पाेत्यांची संख्या याची माहिती देतात. मात्र तीन दिवसांपासून ई-पाॅस मशिन या साॅफ्टवेअर यंत्रणेमध्ये अपडेटस् आले आहेत. यानुसार शेतकऱ्यांची वर्गवारी केली जात आहे. यातच शेतकऱ्यांची जात विचारली जात आहे. यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले आहे. याचबराेबर या प्रकारावर संताप व्यक्त करत आहेत. .

शेतकरी एवढे संतप्त आहेत की, पैसे घ्या, खत द्या आणि आमची जात शेतकरी घ्या, असे म्हणत आहेत. शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये यावरून वाद हाेत आहेत. काही व्यापाऱ्यांनी मशिनकडे बाेट दाखवून हे आॅनलाईन अपडेट्स झाल्याचे सांगितले आहे. मात्र काही व्यापारी शेतकऱ्यांना मदत करताना दिसत नाही. जात अपडेट्स करावीच लागेल, असे सांगून सक्ती करत आहेत. यातून वादाचे प्रसंग घडत आहे. 

खते देण्याचा विषय आहे, इथं जातीचा काय संबंध असे सांगून शेतकरी प्रश्न देखील विचारत आहे. ही पाॅस मशिन केंद्र सरकारच्या खत मंत्रालयाच्या अख्यारीत आहे. दाेन दिवसांपूर्वीच या मशिनचे साॅफ्टवेअर अपडेट्स केले. नव्या अपडेट्समध्ये जातीची माहिती मागवली गेली आहे. याची काेणतीही माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे. थेट कार्यवाही सुरू झाल्याने गाेंधल उडाला आहे, असे राज्याच्या कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

बळीराजाची एकच जात आहे, ती म्हणजे शेतकरी. खत घेताना जातीची विचारणा करून जातीय तेढ निर्माण केली जात असल्याचा आराेप शेतकरी संघटनांनी सुरू केला आहे. हा प्रकार तातडीने थांबवावा, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. अन्यथा राज्यभर आंदाेलन केले जाईल, असे सांगितले आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर


अहो शेतकरी हीच आमची जात आहे.. खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात कसली विचारताय असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला सभागृहात विचारला. सांगली येथे रासायनिक खते खरेदी करताना जात विचारली जात असल्याचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला. जातीवाद निर्माण करणाऱ्या सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले. रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात का सांगावी लागत आहे. ती का नोंदवावी लागत आहे असा सवालही अजित पवार यांनी केला आहे.

ई पाँस साँफ्टवेअर मशीनमध्ये जातीचा रखाना टाकण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांना जात सांगावी लागत आहे. त्यामुळे जातीचे लेबल लावण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडता कामा नये असेही अजित पवार यांनी खडसावून सरकारला सांगितले. या प्रकरणात कनिष्ठ अधिकारी बळीचे बकरे ठरू नये. कोण यामध्ये सहभागी आहे त्याच्यावर कारवाई करावी आणि जातीचे लेबल बंद करावे व याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणीही अजित पवार यांनी केली

Related Articles

- Advertisement -

Latest Articles