Thursday, May 2, 2024
Homeकृषीपीक विम्यासाठी लाल वादळ बीडमध्ये, जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा सहभाग

पीक विम्यासाठी लाल वादळ बीडमध्ये, जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा सहभाग

बीड : अखिल भारतीय किसान सभा जिल्हा बीडच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी गेल्या २०२० च्या खरीप हंगामा अखेरीस झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील पीकविमाधारक शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने विमाप्रावधानातील अव्यवहार्य नियम व अटी लावून नुकसान भरपाई पासून वंचित ठेवल्याच्या नाराजीने व जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख या नात्याने आपले अवधान वेधून घेण्यासाठी बीड मध्ये निदर्शने करण्यात आले.

२०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व पीक नुकसानीचे शासनाच्या महसूल विभागाने केलेले पीक पंचनामे केलेले आहेत व शेतकऱ्यांना मदत ही केली मात्र जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेले असताना महसूल विभागाने केलेले नुकसानीचे पंचनामे गृहीत धरून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा देण्यात यावा. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना जाचक ठरणाऱ्या अव्यवहार्य अटी शतींचा फेरविचार करून त्या वगळून ही योजना शेतकऱ्यांना झालेल्या पीक नुकसानाची भरपाई मिळण्यास सुलभ करावी. आदी मागण्या घेऊन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली 

यावेळी किसान सभेचे नेते ऍड.अजय बुरांडे, कॉ.दत्ता डाके, कॉ.मुरलीधर नागरगोजे, कॉ.मोहन लांब आदीसह जिल्ह्यातील किसान सभेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी किसान सभेच्या शिष्ट मंडळाशी चर्चा करून राज्य शासनाच्या वतीने याबाबतीत लक्ष्य देऊन शेतकऱ्यांवर पीक विमा संदर्भात अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले.

जिल्ह्याभरातील हजारो शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा होऊन रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर शेतकऱ्यांच्या घोषणा व हातातील लाल झेंडे बिडकरांचे लक्ष्य वेधून घेतले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय