Wednesday, February 5, 2025

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन

पुणे : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन झाले आहे. ते ८१ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बालाजी तांबे यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते पण आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. 

तांबे यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल, संजय आणि स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे. तांबे हे सकाळ वृत्तपत्रासोबत काम करत होते. त्यांचे ‘फॅमिली डॉक्टर’ हे सदर चांगलेच गाजले होते. जनसामान्यांना अत्यंत साध्या शब्दात आयुर्वेदाची महती, महत्त्व पटवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

बालाजी तांबे यांचे शिक्षण अभियांत्रिकी क्षेत्रात झाले होते मात्र लहानपणापासून पूजा अर्चना आणि आयुर्वेदाचा त्यांचा पर्यायी अभ्यास सुरू होता. बालाजी तांबे यांच्या गर्भसंस्कारावरील पुस्तकांना देश-विदेशातून मोठी मागणी होती. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झालं आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles