मुंबई : अनेक दिवसांपासून लाॅकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु आता शालेय शिक्षण विभागाने 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याच्या काढलेल्या जीआर ला सरकारने स्थगिती दिली आहे.
टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, शालेय शिक्षण विभागाने दोन दिवसांपूर्वी कोरोणासंसर्ग कमी झालेल्या ग्रामीण भागातील आठवी ते बारावीचे वर्ग 17 ऑगस्ट पासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून काढण्यात आला होता. बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज व्यक्त केल्यानंतर हा निर्णय गीत शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला कभी देण्यात आली आहे.
बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला होता या संवादात त्यांनी शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स च्या सूचना नंतर निर्णय घेण्यात येईल असे म्हटले होते. गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्य सांभाळण्यासाठी निर्णय घेण्यात आले आहेत. टास्क फोर्स च्या बैठकीनंतर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.
शाळा आणि कॉलेज संदर्भात नोटिफिकेशन मध्ये आम्ही स्पष्ट केले आहे, राज्यभरातील त्या त्या भागातील प्रशासन शाळा कॉलेज उघडण्याबाबत निर्णय घेतील, टास्क फोर्स आणि पीडियाट्रिक टास्क फोर्स तसेच पहिल्या कोरणा च्या लाटे पासून आलेल्या टास्क फोर्स सर्वांनी शाळा सुरू करण्याचा विरोध दाखवला आहे. शाळेच्या बाबतीत जो काही निर्णय असेल तो आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत जाहीर होईल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते.
कारण दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अद्याप लसीकरण झालेले नाही, इतर राज्यात असे प्रसंग घडले आहेत. रिस्क घेऊ नये असे त्यांना वाटते. त्यामुळे याबाबत ची बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
– संपादन : आरती निगळे