Friday, March 14, 2025

‘धार्मिक आणि दफनविधी’ कार्यक्रमांना फाटा देत घरच्यांसह मित्रमंडळींसह सासृ नयनांनी भाग्येश (बंटी) वर अंत्यसंस्कार !

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

नारायणगाव / रवींद्र कोल्हे : राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे सामाजिक कार्यकर्ते भाग्येश (बंटी) मोहनगीर गोसावी याचे आज गुरुवार दि.१२ ऑगस्ट रोजी पहाटे दुःखद निधन झाले.

भाग्येशवर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. भाग्येश गोसावी समाजाचा होता. असं असतांनाही बदलत्या काळाप्रमाणे आपणही बदललं पाहिजे याच भावनेतून भाग्येश याच्या घरच्या मंडळींनी नारायणगाव चे सरपंच योगेश पाटे यांनी केलेल्या आव्हानाला सहकार्य करीत अंत्यसंस्कार करण्यास मान्यता दिली. त्याप्रमाणे नारायणगाव स्मशानभूमीत बसविलेल्या पर्यावरण पूरक गॅस शवदाहिनी वर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. दफनविधी करण्यासाठी जागा उपलब्ध होणं कठीण होत चालले आहे.

जग बदललं, गांव बदललं आपणही बदललं पाहिजे. अशा दुःखद स्थितीतही बंटी याच्या घरच्यांनी विचार केला आणि सरपंच पाटे यांच्या सहकार्याने राबवला. जिवाभावाचा मित्र अचानक गेला. याचे दुःख मित्रमंडळींना होते.राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी नारायणगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करून समाजात एक नवा संदेश दिला.

सन १९९९ ला आशिया खंडातील चीन या देशाने दफनविधी कार्यक्रमाला पूर्ण फाटा देऊन हिंदुस्थान प्रमाणेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. कारण भारतापेक्षा क्षेत्रफळ मोठं असलं तरी जागेचा प्रश्न एक ना एक दिवस निर्माण होईल. असं जाणून चीनने अखेर दफनविधी करण्याच्या निर्णयाला फाटा दिला. आणि हिंदुस्थान प्रमाणे अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर भारतात प्रथमच नारायणगाव येथे अशा प्रकारे अंत्यसंस्कार झाले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles