नारायणगाव / रविंद्र कोल्हे : येथील कोल्हेमळा शिवरातून जाणाऱ्या ‘हॉटेल पूनम ते औटी मळा’ ओझर – जुन्नर फाटा या मार्ग अरुंद असल्याने येथील कोल्हेमळा शिवारातील ओढ्यालगत अनेकदा जड वाहने घसरून खाली पडली असल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. आजही एक कार येथे रस्त्याच्या कडेला घसरली.
या रस्त्याची अधिक माहिती अशी की, हा रस्ता अष्टविनायक मार्ग म्हणून ठेकेदार काम करू पहात आहे. मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी या रस्त्याला हरकत घेतली असून, गेल्या ४२ वर्षांपासून शेतकरी लढा देत आहेत. नारायणगाव मधील या रत्याच्या प्रश्न सुटावा म्हणून आमदार आणि खासदार हे दोन्ही लोकप्रतिनिधींच्या विजयात नारायणगावकर म्हणून खारीचा वाटा आहे. मात्र अद्याप या रस्त्याला रुंदीकरणासाठी योग्य येईना? मात्र असं असतांना गेल्या पाच वर्षांत दोनदा या रस्त्याची भूसंपादन प्रक्रिया शासकीय प्रक्रियेच्या फेऱ्यात अडकली आहे.
स्थानिक शेतकरी मात्र लोकप्रतिनिधींभोवती घिरट्या घालीत आहेत. हा रस्ता तालुक्याचाच नव्हे तर पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील दळणवळणासाठी महत्वाचा आहे. याच रत्यावरून तालुक्याचे ठिकाण, ऐतिहासिक, पर्यटन, शैक्षणिक, तीर्थक्षेत्र, कारखानदारी, त्याचप्रमाणे महसूल विषयक, न्यायालय तसेच तालुक्यातील शासकीय कार्यालये अशा कामकाजासाठी नियमित रहदारी असते. याच मार्गाने परदेशी, देशी पर्यटक, अष्टविनायकां पैकी गिरिजात्मक (लेण्याद्री) आणि ओझर (विघ्नहर) ला जाण्यासाठी मार्ग आहे. मात्र या अरुंद रस्त्यामुळे हा मार्ग विघ्नहर्ता ला जायचा मार्ग आहे की विघ्न अंगावर घ्यायचा मार्ग आहे अशी भीती येथील शेतकऱ्यांना वाटत आहे.
शेतकऱ्यांच्या जीविताला धोका असून,प्रशासन यावर काहीच बोलत नाही. हाकेच्या अंतरावर खासदार आणि आमदार या लोकप्रतिनिधींचे संपर्क कार्यालय आहे. मात्र हा प्रश्न जैसे थेच आहे. आता जीवित हानी झाल्यावरच रस्ता रुंद होईल का ? असा सवाल स्थानिक शेतकरी, नागरिक विचारीत आहेत.
दरम्यान आज गुरुवार दि.१२ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास एक स्विफ्ट कार गाडीतील प्रवाशांसह घसरली. त्यात गाडीचे किरकोळ नुकसान झाले मात्र जीवित हानी झाली नाही. स्थानिक सरपंच योगेश पाटे, कार्यकर्ते हेमंत कोल्हे, राजे ग्रुपचे गौतम औटी, भागेश्वर डेरे, ईश्वर पाटे आदी कार्यकर्त्यांनी ताबडतोब क्रेनचालकाला पाचारण करून कार रस्त्यावर काढली. गेल्या महिन्यात याच ठिकाणी एक आयशर कंपनीचा ट्रक कलांडला होता. त्यावेळीही ट्रेकचे मोठे नुकसान झाले. जोपर्यंत रस्ता रुंद होत नाही तोपर्यंत या छोट्या मोठ्या घटना होताच राहणार आहेत. म्हणून रस्ता रुंद होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घातले पाहिजे.
“आँखो देखा ! और सुना भी !
सरपंच योगेश पाटे म्हणाले की, दोन वर्षांनंतर लोकप्रतिनिधींना साडेसाती चालू होते? असे वाटते. नव्याचे नऊ दिवस म्हणतो त्याप्रमाणे ही घटना पाहून तेथे जमलेल्या गर्दीला उद्देशून सरपंच पाटे यांच्या तोंडातून हा शब्द निघाला. ही घटना पाहत असतांना सरपंच यांच्या तोंडून शब्द निघाला, म्हणून आम्ही पाहिले आणि आम्ही ऐकलंही.