Thursday, February 6, 2025

पूर्णा : डीवायएफआय तर्फे वृक्षारोपण करून स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा !

पूर्णा : आज पूर्णेत डीवायएफआयच्या तरुणांकडून स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. डीवायएफआयचे तरुण नेहमीच विविध उपक्रम राबवित असतात. त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी पूर्णा शहरातील डॉ. आंबेडकर नगर येथील जिल्हा परिषद शाळा व शहरातील स्वा. सूर्यभानजी पवार महाविद्यालयात वृक्षारोपण करीत स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला.

वृक्षारोपण करतांना संघटनेचे नसीर शेख, अमन जोंधळे, तुषार मोगले, सोमेश जोंधळे, सचिन नरनवरे, अजय खंदारे, भूषण भुजबळ आणि कुणाल सोनवणे सोबत शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, इतर कर्मचारी, नागरिक आणि महाविद्यालयाचे संचालक, प्राध्यापक व कर्मचारी आदी उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles