सुरगाणा (दौलत चौधरी) : जिल्हा परिषद शाळा वांगणसुळे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काटेकोर नियम पाळून मोजक्या उपस्थित पोलिस पाटील परशराम चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
वांगणसुळे येथे शाळा बंद पण, शिक्षण चालू हे उपक्रम शिक्षक ध्येर्य ठेवून विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन दररोजच्या अभ्यास क्रम देत असतात. तसेच बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला असून जंगले नष्ट होत आहेत. त्याचा थेट परिणाम ऋतुमान हवामान बदलांवर होत असून पाणी पातळी घटण्यावर होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन त्याच बरोबर शाळा व्यवस्थापन समिती गुलाब म्हशे यांनी मार्गदर्शन केले.
गावातील ग्रामस्थ ढवळू पेटार, बळवंत जाधव तसेच अंगणवाडी सेविका निर्मला टोपले, चंद्रभागा पवार मुख्याध्यापक भिका चौधरी, शिक्षक नामदेव चौधरी, देवराम महाले, चभार धुळे, भास्कर महाले, पुरुषोत्तम गायकवाड, शिक्षिका प्रतिभा चौधरी आदी उपस्थित होते.