Wednesday, March 12, 2025

ब्रेकिंग : नेपाळमधून 22 प्रवाशांना घेऊन निघालेलं विमान बेपत्ता, 4 भारतीयांचा समावेश

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

नवी दिल्ली : नेपाळमधून 22 प्रवाशांना घेऊन निघालेलं विमान बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर येत आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या 22 प्रवाशांमध्ये 4 भारतीय होते, अशीही माहिती समोर आली आहे. 

एएनआय वृत्त संस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार,  9 NAET ट्वीन इंजिन असलेल्या विमानाने पोखराहून जोमसोमसाठी सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी उड्डाण झालं होतं. हे विमान तारा एअरलाईन्स कंपनीचं होतं. त्यात 19 प्रवासी होते. तीन क्रू मेंबर्सही होते. बेपत्ता विमानात चार भारतीय आणि तीन जपानी नागरिकही होते. बाकी सर्व नेपाळी नागरिक होते.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण मध्ये रिक्त पदासाठी भरती

हे एअरक्राफ्ट जॉमसॉमच्या हवाई हद्दीत मुस्तंग इथं शेवटचं पाहिलं गेलं होतं. त्यानंतर ते डायवर्ट झालं. इथूनच या एअरक्राफ्टचा संपर्क तुटला. तेव्हापासून या एअरक्राफ्टशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय.

दरम्यान, नेपाळमधील गृहमंत्रालयाकडून दोन खासगी हेलिकॉप्टर शोधकार्यासाठी तैनात करण्यात आली आहे.

आश्रम वेब सिरीज : ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री, ट्रेलर पाहून चाहते म्हणाले – आग लागणार…

बृहन्मुंबई पोलिस विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 7 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Related Articles

- Advertisement -

Latest Articles