Saturday, March 15, 2025

पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचाच डाव ; फडणवीसांनंतर आणखी एका नेत्याचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसापूर्वी ‘देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी एक राजकीय खेळी असू शकते,; असा दावा केला होता, यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे.फडणवीसांनी नुकताच याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

“विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत झोलेल्या पहाटेच्या शपथविधीची राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पूर्ण कल्पना होती, किंबहुना त्यांच्या संमतीनंच सगळं झालं होतं’, असा दावा फडणवीस यांनी नुकताच केला आहे.यावर भाजपचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

सदाभाऊ खोत यांनी या शपथविधीचे वर्णन खास आपल्या ग्रामीण शैलीत करीत टोला लगावला आहे. “शरद पवारांच्या संमतीशिवाय पहाटेचा शपथ विधी होऊ शकत नाही कारण अजित दादा निर्णयच घेऊ शकत नाहीत,”असे सांगत खोत यांनी शेतराखणीचे उदाहरण देत पवारांवर निशाणा साधला आहे.

“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली. तेव्हा पवारसाहेबांना कळले की आता आपल्याला थोडं शांत राहावं लागेल. त्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवाल्यांना सांगितलं की मी येतो तुमच्या बरोबर.अजितदादा येतील, घ्या उद्या शपथविधी. राष्ट्रपती राजवट उठवली आणि ‘राखण्या’ गेला की बरोबर दुसऱ्या दिवशी पवारसाहेबांनी शिवसेनेला आणि काँग्रेसला घेऊन सरकार बनवलं,” असा टोला खोतांनी लगावला.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles