5 एप्रिल रोजी देशविरोधी व कामगारविरोधी धोरणांचा महापाडाव करण्यासाठी कामगारांचा दिल्ली मोर्चा – कॉ.नरसय्या आडम मास्तर
सोलापूर : तब्बल पाच दशकापासून यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतन, कामगार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी आणि कल्याणकारी मंडळ साठी सिटू ने अविरत लढा करत आहे.2009 पासून अद्याप एक ही आमदार कामगारांच्या कल्याणकारी मंडळ बाबत विधानसभेत चकार शब्द उच्चारत नाहीत. लाखोंच्या संख्येने यंत्रमाग कामगार महाराष्ट्रात आहेत. 2015 साली महाराष्ट्र राज्य सरकारने किमान वेतनाची अंमलबजावणी करा असा शासननिर्णय जाहीर केले मात्र कारखानदार त्याची अंमलबजावणी न करता शासननिर्णया विरुद्ध बंद पुकारून उच्च न्यायालयात धाव घेतले. उच्च न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निकाल देऊनही त्याची अंमलबजावणी होत नाही आणि प्रशासन ही मूग गिळून गप्प बसल्याचा संताप आडम मास्तर यांनी व्यक्त केले. देश विरोधी व कामगार विरोधी धोरणांचा महापाडाव करण्यासाठी 5 एप्रिल रोजी दिल्ली मोर्चाचे आयोजन केले देशातून 10 लाख जनतेचा महापाडाव होणार असून यात सोलापूर मधून किमान 5 हजार यंत्रमाग कामगार यात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
सिटू संलग्न लाल बावटा यंत्रमाग कामगार युनियन्स च्या वतीने बुधवार 15 फेब्रुवारी रोजी सिटू चे मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली व सिटू चे राज्य महासचिव अँड.एम.एच.शेख यांच्या उपस्थितीत यंत्रमाग कामगारांचे कल्याणकारी मंडळ व प्रलंबित मागण्या बाबत मेळावा पार पडला.
ते बोलताना पुढे म्हणाले की, लढाऊ यंत्रमाग 54 दिवस संप करून 402 रुपये स्पेशल अलौन्स ची लढाई जिंकले. त्यावेळी सरकार मला पकडण्यासाठी जंग जंग पछाडले मी भूमिगत राहून लढाई यशस्वी केली. आज नगदर आणि तासिकादर या गोंधळामुळे कामगारांचे प्रचंड नुकसान होत आहे. तसेच किमान वेतनाचे रिव्हिजन करण्यास सरकारला भाग पाडले.1995 साली यंत्रमाग कामगारांना माथाडी कायदा लागू करण्यासाठी 3 तास विधानसभेत सभागृह डोक्यावर घ्यावे लागले. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचे विधिमंडळात जाहीर केले. मात्र, आजही प्रतीक्षा कायम आहे. ही मोठी शोकांतिका आहे.
कामगारांना संबोधित करताना एम.एच.शेख म्हणाले की, कामगारांची संख्या घटत आहे. लोकांना रोजगार मिळणे कठीण झाले.प्रस्थापित व्यवस्थेतील काही मूठभर लोक सत्ता आणि पैशाच्या जोरावर श्रमिकांची पिळवणूक करून त्यांना भुकेकंगल केले. कामगारांची सामाजिक आणि आर्थिक,शैक्षणिक स्तर उंचावत नाही.आज कामगार जगण्या मरण्याची लढाई करीत आहेत.कामगारांनी चाकोरी बाहेर जाऊन विचार करावे आणि न्याय हक्कासाठी लढावे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक कॉ.किशोर मेहता यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अँड.अनिल वासम यांनी केले. यावेळी सिटू चे राज्य महासचिव अँड.एम.एच.शेख, सिटू चे राज्य सचिव युसूफ शेख मेजर, युनियन चे सचिव व्यंकटेश कोंगारी आदींनी सभेला संबोधित केले. यावेळी विचारमंचावर बुवा लक्ष्मण माळी, शहाबुद्दीन शेख, रामकृष्ण गुंड, शंकर गड्डम, मोहन दुडम, अंबादास कुरापाटी, नरसप्पा चिम्मन, अरुण सामल, मनीषा लोखंडे, शरिफा शेख, मल्लव्वा तेलंग आदी उपस्थित होते.
सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी विल्यम ससाणे, बापू साबळे, विरेंद्र पद्मा, दीपक निकंबे, लक्ष्मीनारायण जोरीगल, राजू गेंट्याल, बाळकृष्ण मल्याळ,वसीम मुल्ला, बालाजी तुम्मा, बालाजी गुंडे, अशोक बल्ला आदींनी परिश्रम घेतले.
