अहमदनगर:त्यागमूर्ती माता रमाई यांची 125 वी जयंती ताजनापूर ता.शेवगाव या ठिकाणी मोठ्या थाटामाटात व आनंदात महिलांनी साजरी केली माता रमाई व सावित्रीबाई यांच्या त्यागामुळेच महिलांना शिक्षण घेता आले या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या
यावेळी माता रमाई यांच्या जीवन कार्यावर भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष अरुण भोंगळे बौद्धाचार्य विजय हुसळे सर, चंद्रकांत कर्डक सर, रामभाऊ साळवे, यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विमल मधुकर गायकवाड होत्या तर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता मंदा बाळासाहेब गायकवाड, सोनाली बबन गायकवाड, मुक्ता जालिंदर गायकवाड, सुशिलाबाई हिरामण गायकवाड, साखरबाई रामभाऊ गायकवाड, यमुना गायकवाड,,यांनी अथक परिश्रम घेतले .

याप्रसंगी 2022 मध्ये घेण्यात आलेल्या बौद्धाचार्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या बौद्धाचार्यांचा तालुकाध्यक्ष आरूण भोंगळे जिल्हा संस्कार सचिव संतोष पटवेकर यांच्या हस्ते बौद्धाचार्य विजय हुसळे सर, बाळासाहेब धस गोरक्षनाथ शेलार, यांना बौद्धाचार्य प्रमाणपत्र देण्यात आले.प्रमुख उपस्थितीत तुळशीदास भोंगळे, जीवन अंगारखे, गव्हाणे सर, मधुकर गायकवाड, जालिंदर गायकवाड, बबन गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, जीवा गायकवाड, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पटवेकर यांनी केले तर आश्रू गायकवाड गुरुजी, यांनी मान्यवरांचे आभार मानले