गेल्या ७ फेब्रुवारीपासून ‘व्हॅलेंटाईन वीक’ सुरू झाला आहे. यामुळे तरुणाईची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेकांनी प्रेमाचा दिवस सेलिब्रेट करण्याचे नियोजन केले आहे.
या दिवसाचे महत्त्व जपण्यासाठी ‘सुंदर’ भेटवस्तूसोबतच विविध चॉकलेटचे प्रकार, भेटकार्ड, टेडीबिअर, केक, अशा वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे.
प्रेम व्यक्त करण्याचा दिवस (१४ फेब्रुवारी) साजरा करण्याचे विविध बेत विविध महाविद्यालयीन तरुण- तरुणींनी ठरविले आहेत. ‘तुमच्यासाठी काय पण…’ सांगत प्रेमाची कबुली देण्यासाठी युवक, युवतींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (Valentines Day 2023 Youth ready jalgaon news)
‘व्हॅलेंटाईन डे’ केवळ तरुण-तरुणींमध्ये साजरा केला जातो असे नाही, तर आई, वडील, बहीण, भाऊ, मित्र-मैत्रिणीतील प्रेम यादिवशी व्यक्त करता येते. मात्र, काही वर्षांपासून केवळ तरुणाई या दिवसाच्या वलयात गुरफटून गेली आहे.
अनेकांनी या दिवसानिमित्त विविध बेल आखले आहेत. त्यात व्हॅलेंटाईन पार्टी, गेट टूगेदर केले जाणार आहे. त्यामुळे विविध हॉटेल्स, रेस्टॉरंटकडूनही ‘व्हॅलेंटाइन डे’साठी विविध ऑफर्सही दिल्या आहेत.
यादिवशी हटके दिसण्यासाठी लाल रंगांचे कपडे खरेदीसाठी बाजारांमध्ये गर्दी होत आहे. प्रिय व्यक्तीला भेटण्यासाठी सुंदर दिसण्यासाठी तरुणाई पार्लरकडे जात आहे. प्रत्येक तरुणाईने मित्र-मैत्रिणीने ग्रुपनुसार लाल, काळा रंगांची थीम ठरवून ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करायचा, असे ठरविले आहे.
यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ला विविध शॉपीजमध्ये शुभेच्छापत्रांबरोबरच विविध फ्लेवर्समधील चॉकलेट उपलब्ध झाली आहेत. त्यात हँडमेड चॉकलेटसह इम्पोटेड चॉकलेटचा समावेश आहे. चॉकलेटचे आकर्षक बॉक्स गिफ्ट म्हणून देण्यावर अनेक जण भर देत आहेत.
गिफ्ट आर्टिकलमध्ये म्युझिकल प्रेमाचा संदेश देणारी टेडीही उपलब्ध असून, ते तरुणाईला भुरळ घालत आहेत. विशेषतः लाल-गुलाबी रंगाच्या गिफ्टला यंदाही विशेष मागणी राहणार असून, त्यातील वेगळेपण लक्ष वेधक ठरत आहे.
शुभेच्छापत्रांपासून ते विविध गिफ्ट आर्टिकलवर त्याचा नक्कीच प्रभाव आहे, तर अनेकांनी या दिवशी लग्नाचे मुहूर्तही साधले आहेत.
तुमच्यासाठी काय पण…! ‘व्हॅलेंटाईन डे’साठी तरुणाई सज्ज
- Advertisement -