पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:शहरांमध्ये बंगल्यांसमोर,सोसायट्यांमध्ये झाडे लावण्याचा छंद एक चांगला संदेश देतो.झाडे लावा,झाडे जगवा, या आवाहनाला प्रतिसाद देत लोक शहरांमध्ये आपापल्या परीने झाडे लावतात. त्यांची काळजी घेतात. त्यामुळे शहरांमधल्या कॉलन्या, सोसायट्यांना एक प्रकारचा हिरवा टच येतो. मात्र या झाडांमुळे एक समस्याही निर्माण होते. ती म्हणजे वाळलेल्या पानांचा कचरा.
बंगलेमालकांना अथवा सोसायट्यांच्या नोकरांना ही वाळलेली पाने गोळा करून जाळून टाकण्याचे एक कामच लागते. त्यामुळे कधी कधी लोकांना का झाड लावले, असे वाटणे साहजिकच आहे. शिवाय वारंवार हा झाडांच्या वाळलेल्या पानांचा कचरा गोळा करून जाळल्याने धूर होतो. लोकांच्या नाका-तोंडात जातो. लोकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे पाला-पाचोळा गोळा करून कंपोस्ट खत करायला शेतकर्यांना दिला तर पर्यावरण रक्षणासोबत शेतकऱ्यांना सहाय्य केल्याचं समाधान लाभेल.
गेले कित्येक वर्षापासून महापालिकेच्या अधिकार्यांकडे पालापाचोळा गोळा करून त्याच परिसरात कंपोस्टिंग करण्यासंदर्भात मदत मागितली आहे. ही चळवळ लोकप्रिय झाल्यास याचे नेटवर्क जाळेही हळूहळू इतर शहरांमध्ये पसरत जाईल. लोकांना योग्य मार्गदर्शन केल्यास त्यांची चांगली मदत पर्यावरण रक्षण करण्यास मदत होईल.अशी सूचना महात्मा फुलेंनगर येथील सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले यांनी केली आहे.
पाला-पाचोळा गोळा करून कंपोस्ट खत निर्माण करा-शिवानंद चौगुले
- Advertisement -