पुणे : पीक विमा प्रश्नी पुणे कृषी आयुक्त कार्यालयावर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने 30 ऑगस्ट 2021 रोजी राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी दिली.
हे पण वाचा ! भारताची विक्री थांबवा, जनतेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोचे आवाहन !
सन 2020 साली परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पीक विमा कंपन्यांनी नुकसानभरपाई द्यावी, पीक विमा योजनेत शेतकरी हिताचे धोरणात्मक बदल करावेत या प्रमुख मागण्यांना घेऊन हा राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे.
हे पण वाचा ! १९ विरोधी पक्षांची भारतीय जनतेला हाक ! केले संयुक्त निवेदन सादर
प्रसिद्धी पत्रकावर किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, ऍड. अजय बुरांडे, डॉ. अजित नवले आदींची नावे आहेत.