Wednesday, May 1, 2024
Homeआंतरराष्ट्रीयकाबुलच्या विमानतळाबाहेर दहशतवादी हल्ला, ८० जणांचा मृत्यू तर २०० जखमी

काबुलच्या विमानतळाबाहेर दहशतवादी हल्ला, ८० जणांचा मृत्यू तर २०० जखमी

अफगाणिस्तान : राजधानी काबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर गुरुवारी संध्याकाळी आत्मघातकी हल्ला झाला. या हल्ल्यांमध्ये ८० जण ठार झाले असून २०० जखमी झाल्याचे वृत्त आहे. या बॉम्बस्फोटच्या घटनेमुळे काबूल हादरले आहे.

या स्फोटातील मृत्यूमध्ये महिला, लहान मुलांसह १२ अमेरिकन सैनिकांचा समावेश आहे. या स्फोटांची जबाबदारी ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेनं घेतली आहे. काबूल विमानतळाच्या अॅबे गेटजवळ एक स्फोट झाला असून तर दुसरा स्फोट काबूलच्या बेरान हॉटेलजवळ झाला आहे. या संबंधीचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्त संस्थेने दिले आहे.

दरम्यान, तालिबान आणि अमेरिकेच्या दुतावासातून काबूल विमानतळावर हल्ल्या संदर्भातील अलर्ट जारी करण्यात आला होता.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय