पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:वाढते शहरीकरण, बांधकाम प्रकल्प आणि वाहतूक कोंडी वाहनांच्या धुरामुळे वायू प्रदूषण वाढले असून या वर्षातील मागील तीन महिने पिंपरी चिंचवड शहरातील हवा रोगट असल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. राज्यात सर्वाधिक हवा प्रदूषण असलेल्या शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड आणि पुणे पहिल्या दहा क्रमांकात आले आहे.हवेची दररोजची प्रदूषण पातळी तपासण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,पिंपरी येथे फुफ्फुसातील एक्यूआय (वायू गुणवत्ता दर्शक फलक) बसविण्यात आला आहे.त्यामुळे शहरातील हवेचे प्रदूषण समजते.
पावसाळ्यानंतर हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण सुरू झाले आहे.शहरात 9 लाख वाहने आणि वाहतूक कोंडीमुळे भोसरी,पिंपरी,भूमकर चौक,वाकड येथे प्रदूषण वाढले आहे.या वर्षात बांधकाम क्षेत्रात मोठी तेजी आली आहे.विविध बांधकाम प्रकल्पातून धूळ मातीचे कण हवेत पसरत आहेत.दररोज शहरात होणारे कचरा संकलन,रस्त्यांची झाडलोट,मनपाची विविध प्रभागात रेंगाळत असलेली विकासकामे तसेच औद्योगिक वसाहतीतील अनिर्बंध गैरव्यवस्थापन यामुळे वतावरणात धूळकण पसरत आहेत.
वायू गुणवत्ता आणि जनआरोग्य
0 ते 50 – आरोग्यासाठी चांगला
51 ते 100 – साधारण प्रदूषित – आधीच श्वसनाचे आरोग्यासाठी त्रासदायक
101ते 200 – अधिक प्रदूषित – दमा, श्वसनाचे रोग आणि हृदयरोग्यासाठी धोकादायक
201 ते 300 – अति प्रदूषित – सर्व नागरिकांसाठी धोकादायक असते.
301 ते 400 – धोकादायक
हवेतील मुख्य व घातक प्रदूषके असलेल्या पीएम 2.5 आणि पीएम 10 मध्ये अनुक्रमे 70 टक्के आणि 61 टक्के एवढी मोठी वाढ मागील सहा वर्षांमध्ये झालेली आहे.पिंपरी चिंचवड महापालिकेची गुणवत्ता तपासणी फुफ्फुसे जानेवारी मध्ये संपूर्ण काली पडली आहेत.सरासरी दिवसाचा एक्यूआय 200 ते 260 आहे.
फक्त कोरोना काळात शहर प्रदूषण मुक्त होते.यावर्षीच्या हिवाळ्यात नागरिक विविध साथीच्या आजाराने त्रस्त होते.प्रदूषित वायूमुळे लहान मुले,विद्यार्थी,कामगार वर्ग सर्दी,पडसे,कफ,घशाची खवखव यामुळे सतत आजारी पडत आहेत.गरजेपेक्षा जास्त वाहनांचा वापर,औद्योगिक प्रदूषण,कचरा जाळणे,बांधकाम प्रकल्प,अर्धवट विकास कामे हे सर्व घटक पिंपरी चिंचवड शहरात हवेचे प्रदूषण करत आहेत.लोकांनी स्वयंप्रेरणेने निसर्ग स्वछ ठेवावा.
अतिसूक्ष्म धूळीकण,धूर आणि रोगट हवेमुळे शहरातील नागरिक आजारी
- Advertisement -