वय फक्त एक आकडा आहे असं आपण अनेकदा लोकांना सांगताना ऐकतो. आयुष्यात ध्येय गाठण्याची इच्छाशक्ती असेल तर वयाची कोणतीही बंधने तुम्हाला रोखू शकत नाहीत. सोशल मीडियावर स्क्रोल करताना आपल्याला असे अनेक व्हिडिओ दिसतात जे आपल्याला उत्तेजित करतात.वयोवृद्ध लोक आपले छंद जोपासताना दिसतात. आपल्यासाठी असे वयोवृद्ध लोक एक उदाहरण आहेत. तामिळनाडूच्या कल्लीदैकुरिची शहरात या वृद्ध महिला थमिरारानी नदीच्या पाण्यात डुबकी मारताना दिसत आहे.
या व्हिडिओ क्लिपने सोशल मीडिया वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. IAS अधिकारी सुप्रिया साहू यांनी 6 फेब्रुवारी रोजी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला होता.
या वृद्ध महिलेला पाहून ती स्तब्ध झाली आणि व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘तामिळनाडूतील कल्लीदैकुरिची येथील तमीराबराणी नदीत या साडीने नेसलेल्या वृद्ध महिलेला सहजपणे डायव्हिंग करताना पाहून धक्का बसला. मला सांगण्यात आले आहे की ते त्यात निपुण आहे कारण ती हे नेहमीच आवडीने करते.
एका पुलावर खूप उंचीवरून ही महिला डायव्हिंग करण्यापूर्वी अंतर मोजताना दिसते. एवढी उंची बघून सर्वात आधी तर आपल्यालाच भीती वाटते त्यानंतर ते अचानक उडी मारून पाण्यात दिसतात. ही महिला यात खूप तज्ञ असल्यासारखी वाटते. हा पराक्रम पाहून लोकही खूप आश्चर्यचकित झाले आहेत. ही वृद्ध महिला नेहमीच साडी नेसून मुटका मारत असते. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.