Wednesday, February 5, 2025

पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – किसान सभेची मागणी

बीड / अशोक शेरकर पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने उपजिल्हाधिकारी परळी वैजनाथ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

किसान सभेचे नेते कॉ. अजय बुरांडे म्हणाले, मागील आठवाड्यात जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस या मुळे जिल्ह्यात सर्वत्र भयानक पूरपरस्थिती उदभवली आहे. तसेच पाणी विसर्गाच्या नियोजन आभावी प्रशासकीय धोरणाने आणखीनच भर टाकल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. जागोजाग शेतात पुराचे पाणी शिरले असून शेतात पाणी साचून राहिल्यामुळे काढणीस आलेले सोयाबीन, कापूस, ऊस इत्यादी पीके जमीनदोस्त झाली. सडली आहेत अशा बऱ्याचश्या जमिनी वाहून गेल्या आहेत.  यात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास तर गेलाच पण उपजीविकेचे कायम साधन असणारी जमीनही वाहून गेली. 

हे वाचा !  ..तर मोदी सरकारही पडू शकते ! – अण्णा हजारे

ही भयावह परिस्थितीतून खचलेल्या शेतकऱ्यांना तुर्तास दिलासा देण्यासाठी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये व जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये तातडीची मदत करावी. तसेच पिक विम्याच्या माध्यमातूनही यांना मदत करावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी कॉ.मुरलीभाऊ नागरगोजे, कॉ.पांडुरंग राठोड, कॉ.सुदाम शिंदे, कॉ.बालाजी कडभाने, कॉ.अंकुश उबाळे, विष्णू काळे, कैलास गोरे, सोपान ठोंबरे, सागर देशमुख, दिलीप काळे व शेतकरी उपस्थित होते.

आजच नोंदणी करा ! मोफत ऑनलाईन वधूवर परिचय मेळावा


Related Articles

- Advertisement -

Latest Articles