Wednesday, February 5, 2025

पिंपरी चिंचवड : खोदाई – खड्डे, चिखलात रुतला जाधववाडीचा विकास, नागरिक त्रस्त

नियोजनशून्य कामामुळे प्रभाग ब्रेकडाऊन – शिवसेना विभाग प्रमुख राजू भुजबळ

पिंपरी चिंचवड : चिखली, जाधववाडी, रंगनाथनगर, आहेरवाडी, सावतामाळी मंदिर परिसर, बोल्हाईचा मळा, पेठ क्र.16 या ठिकाणी सर्वत्र खोदाई, चिखल आणि खड्ड्याचे साम्राज्य आहे.

गेली दोन वर्षे प्रभाग क्र.2 हा स्मार्ट वार्ड केला जाईल अशी वारंवार आश्वासने दिली जात आहेत. येथील रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. अंतर्गत भूमिगत गटारांची कामे करताना नियोजन नसल्यामुळे वेगवेगळ्या ठेकेदारांनी रस्ते खोदले त्यानंतर त्या रस्त्यांची डागडुजी नीट न केल्यामुळे रंगनाथनगर, बोल्हाईचा मळा, सावतामाळी मंदिर परिसरात, तसेच आहेरवाडीच्या मुख्य रस्त्यावर धोकादायक खड्डे पडले आहेत, पावसाचे पाणी निचरा होईल असे काम स्थापत्य विभागाने केले नसल्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबते, आणि तेथे चिखल होतो तसेच प्रभागात डासांचे प्रमाण वाढलेले आहेत

विद्युत विभाग, स्थापत्य विभाग यांच्यामध्ये समन्वय नाही, वाढीव कामे करून करदात्यांच्या पैशाचा अपव्यय होऊ शकतो. विजेचा खेळखंडोबा, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा आणि सर्वत्र रस्त्याची खोदाई यामुळे पेठ क्र 16 राजेशिवाजी नगर, जाधववाडी येथील नागरीक त्रस्त आहेत. 

शिवसेना विभाग प्रमुख राजू भुजबळ यांनी सांगितले की, वेळेत विकासकामे होत नाहीत, कोणत्या ठेकेदारांकडे कोणते काम आहे आणि किती दिवसात ते पूर्ण होणार आहे. याची माहिती दिली पाहिजे, रस्त्यावरील पॉट होल्स (खड्डे) मृत्यूला आमंत्रण देऊ शकतात, तुंबलेल्या पाण्यामुळे डेंग्यू पसरू शकतो. एकाच वेळी सर्व कामे सुरू केल्यामुळे प्रभाग ब्रेकडाऊन झाला आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles